भोकर,गंगाधर पडवळे| होऊ घातलेल्या राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रत्येक पक्ष राजकीय कार्यकर्ते, समाजसेवक, यांना आपली ताकद वाढवण्यासाठी आपल्याकडे कसा खेचता येईल यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असताना दिसून येत आहे. शहरात, गावात वजन आहे त्याच्या पाठीमागे लोक आहेत. अशांना विविध जबाबदारी देऊन कामाला लावत आहेत त्यामुळे पक्षाची ताकद वाढून उमेदवार विजयी होण्यासाठी नक्कीच मदत होईल अशी विव्ह रचना आखताना दिसून येत आहेत. त्यामुळेच की काय शहरातील एक नामांकित घराण्यातील, निष्कलंक व्यक्तिमत्व, समाजसेवक तथा जंगम समाज भूषण त्र्यंबकआप्पा पटवेकर यांचे धाकले चिरंजीव मेडिकल असोसिएशनचे तालुका पदाधिकारी श्रीपाद पटवेकर यांची भारतीय जनता पार्टीच्या भोकर शहर उपाध्यक्षपदी निवड करून पुढील भावी कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.


भोकर शहरातील कोळी गल्ली येथील रहिवासी तथा सामाजिक कार्यकर्ते तरुणाईच ताईत जनसामान्यांचा आधार नेहमी मित्राच्या गराड्यात वावरणारे वैद्यकीय क्षेत्रात एक नावाजलेले नाव असणारे श्रीपाद त्र्यंबक पटवेकर यांची त्यांच्या कार्याची दखल घेत दिनांक 22 10 2024 रोजी भोकर विधानसभेच्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार एडवोकेट श्रियाताई अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते वरील निवडीचे निवडी पत्र देऊन त्यांचा कार्याचा अहवाल उपस्थितांपुढे वाचून भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा परिषद च्या माजी अध्यक्ष मंगाराणी अंबुलगेकर, आशुतोष भैया राजूरकर माजी नगराध्यक्ष विनोद पाटील चिंचाळकर साहेबराव सोमेवाड, शहराध्यक्ष विशाल माने, युवा तालुका अध्यक्ष विनू कोंडलवाड डॉक्टर किरण पांचाळ, श्रीनिवास पटवेकर, बालाजी घिसेवाड यांच्यासह वार्डातील असंख्य महिला तरुण वयोवृद्ध मतदार उपस्थित होते.


पुढे आश्वासित करताना नवनिर्वाचित शहर उपाध्यक्ष मनाली की हा वार्ड नेहमीच भारतीय जनता पार्टीच्या बाजूने राहणार असून येथील लोकांचा मुख्य व्यवसाय हा शेती व मजुरी आहे कष्टाळू लोक नेहमीच सत्याची कास धरतात तर आम्हाला होणार आमदार हा आमच्या सुखदुःखात त्याचबरोबर छोट्या-मोठ्या कामात काम येणार हवा आणि आमचे मतं विश्वासात घेणारा हवा यासाठी आम्ही यावेळी राज्याची विकास पुरुष तथा माजी मुख्यमंत्री राज्यसभा सदस्य अशोकराव चव्हाण साहेब यांची सुकन्या एडवोकेट श्रीजयाताई चव्हाण या आमदार म्हणून निवडून येणारच आहेत. परंतु भोकर मतदार संघाचा व माझ्या वार्डाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी त्यांना मला मंत्री म्हणून पहायच आहे.


त्याकरिता शहरातील प्रत्येक वार्डातील मताची टक्केवारी वाढवून ताईंना 90% मतदान कसं होईल याची मी काळजी घेईल व रेकॉर्ड ब्रेक मतांनी आपला विजय होणार यात शंका नाही असे मत या ठिकाणी व्यक्त केले. तर ताईंनी आपल्या मनोकामद्धे महिलांच्या उत्थानासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार विविध योजना राबवीत आहे त्यात आणखी नवनवीन योजना येण्याची शक्यता असून त्याकरता एक महिला म्हणून महिलांचे दुःख समजण्यासाठी राज्य मंत्रिमंडळात मांडण्यासाठी महिला सबली करण्यासाठी महिलांनी जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन केले आहे. येथील जनतेला मी काहीच कमी पडू देणार नसून मी तुमची लेक आहे त्यामुळे तुमचं व माझं नातं आलं असून मला भरगोसमताने विजयी करा अशी भावनिक साद ही त्यांनी यावेळी जमलेल्या सर्व मतदार व महिला मतदारांना घातली.

सुरुवातीला भोकर विधानसभा भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार एडवोकेट श्री जयाताई चव्हाण यांचा सत्कार सौ मंगलाताई त्र्यंबक पटवेकर, कोमल श्रीपाद पटवेकर व त्यांच्या कुटुंबाकडून करण्यात आला तर या छोटेखाली कार्यक्रमाची सुरेख सूत्रसंचालन पत्रकार गंगाधर पडवळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार श्रीनिवास पटेवेकर यांनी मानले.


