नांदेड| उन्हाळी सुट्यात होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वेने हुजूर साहिब नांदेड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – हुजूर साहिब नांदेड विशेष गाडी च्या दोन फेऱ्या करण्याचे ठरविले आहे, ते पुढील प्रमाणे –
1 ) हुजूर साहिब नांदेड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस: गाडी क्रमांक 07059 हुजूर साहिब नांदेड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष गाडी दिनांक 24 मे 2025 शनिवारी रात्री 23.00 वाजता हुजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकावरून सुटेल आणि हि गाडी, पूर्णा, परभणी, मानवत रोड, सेलू, परतूर, औरंगाबाद, लासूर, रोटेगाव, नगरसोल, मनमाड, नासिक रोड, इगतपुरी, कल्याण मार्गे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे रविवारी दुपारी 14.30 वाजता पोहोचेल.
2) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – हुजूर साहिब नांदेड : गाडी क्रमांक 07060 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – हुजूर साहिब नांदेड विशेष गाडी दिनांक 25 मे 2025 रविवारी दुपारी 15.50 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानका वरून सुटेल आलेल्या मार्गानेच हजूर साहिब नांदेड येथे सोमवारी सकाळी 06.30 वाजता पोहोचेल. या गाडीत जनरल, स्लीपर, वातानुकूलित असे 18 डब्बे असतील.

