हिमायतनगर। बहुजन समाज पार्टीचे काम गेल्या अनेक वर्षांपासून मी निष्ठेनं करीत आहे. विधान सभा अध्यक्ष म्हणून ही या ठिकाणी चांगल्या प्रकारे काम हदगाव, हिमायतनगर विधान सभा मतदारसंघात केलेले आहे. म्हणून आगामी विधानसभा निवडणुकीत मला बसपाकडून संधी मिळाल्यास मी निवडणूक लढविण्यास मी तयार आहे. असे मत बसपाचे नेते माजी विधान सभा अध्यक्ष गणेश राऊत यांनी केले.
यावेळी पुढे बोलतांना राऊत म्हणाले की, हदगाव, हिमायतनगर विधान सभा मतदारसंघात मी गेल्या अनेक वर्षांपासून काम करीत आहे. गेल्या जिल्हापरिषद निवडणूकीत माझ्या पत्नीला सरसम जि. प. गटातून बसपाने संधी दिली होती. या निवडणूकीत धनदांडग्यांच्या विरोधात उभे राहून आम्ही सन्मान जनक मते मिळवून पक्षाचा नावलौकिक वाढविला. फूले, शाहू, आंबेडकर, अण्णाभाऊ, मा. कांशीराम यांच्या विचाराचा वारसा खांद्यावर घेऊन काम करतांना अनेक मोर्चे, आंदोलने करून गरजवंत व गोरगरीबांना न्याय मिळवून देण्याचे काम अविरतपणे करीत आहे. जवळपास दोन दशके बसपाचे काम निष्ठेने करत असल्यामुळे मला पक्षाने यावेळेस संधी द्यावी.
मला जर पक्षाने हदगाव, हिमायतनगर विधानसभा निवडणूक लढविण्याची संधी व तसा आदेश दिल्यास मी आगमी विधान सभा निवडणूक लढवून संधीचे सोने करीन, या मतदारसंघात जनता घराणे शाहीला वैतागली आहे. जनता परिवर्तनाच्या मार्गावर आहे. अश्या अवस्थेत पक्षाने माझ्या बाबतीत सहानुभूती पूर्वक विचार करून मला संधी द्यावी. अशी मागणी बसपाचे गणेश राऊत यांनी केले.