नवीन नांदेड| वाढदिवसाच्या निमित्ताने होणारा अनाठायी खर्चाला फाटा देत सामाजीक बांधीलकी जोपासत ज्या समाजात आपण जन्म घेतो त्या सामाजाचे काही देणे लागतो ही भावना आपल्या डोळया समोर ठेऊन गेल्या पाच वर्षापासून आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून व्हाईस ऑफ मीडीया पत्रकार संघाचे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष तथा गोपाळचावडी ग्राम पंचायत सदस्य प्र व संतोष कन्या प्राथमीक शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष अनिल धमने यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजीक बांधीलकी जोपासत वाघाळा येथिल संतोष कन्या प्राथमिक शाळा येथे पहिली ते पाचवी पर्यंत च्या विद्यार्थी यांना प्रत्येकी एक वही एक पेन व एक सुचित्र बालमित्र उजळणी पुस्तक वाटप तर गोपाळचावडी येथील जिल्हा परिषद शाळा येथे पहीली ते चौथी पर्यंत च्या विद्यार्थी यांना प्रत्येकी वही पेन सुचित्र बालमित्र पुस्तक प्रत्येक विद्यार्थी यांना शालेय साहित्य वाटप व वृक्षारोपन तर प्राथमिक आरोग्य केंद्र जवाहर नगर तुप्पा येथे रुग्णांल्यातील रुग्णांना फळे वाटप करण्यात आले व वृक्षारोपन करण्यात आले,या ऊपकमाचे अनेकांनी अभिनं दन केले.
सामाजिक क्षेत्रात व राजकारणा मध्ये अग्रेसर असलेले अनिल धमणे यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून २४ आगसष्ट रोजी आपल्या वाढदीवसा निमित्त तुप्पा प्राथमिक आरोग्य केंद्र जवाहरलाल नगर येथे रुग्णांन फळे वाटप करूण वृक्षारोपण करण्यात आले हडको येथील संतोष प्राथमिक शाळा हडको व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोपाळचावडी येथील विद्यार्थी यांना शैक्षणिक शालेय साहित्य म्हणून वही,पेन,व सचित्र बालमित्र पुस्तके शालेय साहित्य वाटप केले तर दि २५ ऑगस्ट रोजी विष्णुपूरी येथे अनिल धमने यांच्या वाढदिवसा निमित्त भास्कर हंबर्डे यांनी दत्त मंदीर येथे त्यांच्या वाढदिवसा निमित्त मठ परिसरात वृक्षारोपन व अन्नदान खिचडी वाटप करण्यात आले यावेळी सोमनाथ भारती महाराज यांच्या सह अनेकांची उपस्थिति होती.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ संतुकराव हंबर्डे, राष्ट्रवादी कॉग्रेस अजीत पवार गटाचे महानगर अध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य जिवन पाटील घोगरे ,व्हॉईस ऑफ मिडीया पत्रकार संघाचे महानगर अध्यक्ष डॉ गणेश जोशी दै.नवराष्ट्र चे विभागीय अवृत्ती प्रमुख सुनिल जोशी .बळीरामपुर जिल्हा परिषद मा सदस्य गंगाप्रसाद काकडे,युवा नेते संजय पाटील घोगरे, देवराव काकडे . वृक्ष मित्र मोहनराव घोगरे भगवान घोगरे ,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष संग्राम पाटील मोरे , नविन नांदेड पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश ठाकुर ,किरण देशमूख,निळकंठ वरळे ,श्याम जाधव ,तिरुपती घोगरे,
सारंग नेरलकर ,जेष्ठ नागरीक शंकर धिरडीकर,संजय सोनकांबळे, गणेश जिंदम, संतोष शिंदे ,अविनाश गवळे ,सामाजीक कार्यकर्त, भास्कर हंबर्डे, गोपाळचवडी ग्रामपंचायत सरपंच प्रतिनिधी प्रदीप लाखे,भाजपा विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष,श्याम नायगावे, नवनाथ डकोरे,राजू कऱ्हाळे . यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. गजानन गुडपे ,आरोग्य सहाय्यक इंदूरकर, मधूकर तेलंग ,आरोग्य साहयीका ज्योती पवार ,मिना कांबळे . अरुणा बेंडला ,रेखा पोटे मेथेकर, मंगलाबैनवाड ,सि.बी. घोडजकर अशोक कंधारे व कर्मचारी यांची उपस्थिती होती तर संतोष कन्या प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक गणेश ढगे,ईश्वर धुळगुंडे ,संजीव सिद्धापूरे, अश्विनी आवळे ,वर्षा देशमुख , रंजना शेळके , रेखा दिंडे , व कर्मचारी व गोपाळचावडी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक ,यांची उपस्थिती होती.तर नविन नांदेड मराठी पत्रकार संघाच्या वतीने शुभेच्छा दिल्या.