नांदेड। येथील लंगर साहिब गुरुद्वाराचे मुख्य जत्थेदार संत बाबा नरेंद्रसिंघ व संत बाबा बलविंदरसिंघ यांचे विश्वासू चंद्रपूर येथील सुप्रसिध्द व्यावसायिक सरदार गुरुनामसिंघ पड्डा यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. ते ४७ वर्षाचे होते.
सेवादार सरदार गुरुनामसिंघ पड्डा यांच्या आकस्मित निधनाबद्दल संत बाबा नरेंद्रसिंघ व संत बाबा बलविंदरसिंघ यांनी दुःख व्यक्त केले आहे. लंगर साहिब गुरुद्वारा च्या कार सेवेत ते नेहमी अग्रेसर असायचे. त्यांच्या निधनाबद्दल सिख समाजा सह सर्वत्र हळ हळ व्यक्त केली जात आहे. लंगर साहिब गुरुद्वारा च्या वतीने आयोजित सालाना बरसी कार्यक्रमात त्यांनी हिरहिरिने भाग घेतला होता.
त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी त्यांच्या चंद्रपूर येथील घरी दिनांक 25-08-24 ते 27-08-24 पर्यंत श्री अखंडपाठ ठेवण्यात येणार आहे. संत बाबा नरेंद्रसिंघ जी 27 ऑगस्ट रोजी चंद्रपूर येथे अखंड पाठाच्या समाप्ती ला उपस्थित राहणार आहेत. नानक साई फाऊंडेशन च्या वतीने सरदार गुरुनामसिंघ पड्डा यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
गुरुद्वारा लंगर साहिब श्री हजूर साहिब यांच्यावर अपार प्रेम आणि भक्ती असलेले सरदार गुरनामसिंग जी पड्डा यांनी वाहेगुरुजींच्या इच्छेनुसार हे नश्वर जग सोडले. वाहेगुरु साहेब त्यांच्या आत्म्याला आपल्या चरणी चिरशांती देवो आणि परिवाराला शोक सहन करण्याची शक्ती देवो अशी भावना लंगर साहिब गुरुद्वारा चे मुख्य जत्थेदार संत बाबा नरेंद्रसिंघ व संत बाबा बलविंदरसिंघ यांनी व्यक्त केली.