शिवणी, भोजराज देशमुख| किनवट तालुक्यातील मौजे दयाळ धानोरा येथील प्रकाश जाधव यांनी अनेक वर्षे देशाच्या सीमेवर देश सेवा केल्यानंतर हिमायतनगर/ हदगाव तालुक्याच्या महसूल विभागात तलाठी म्हणून कार्य केले.तर नांदेड येथे नुकतेच संपन्न झालेल्या जिल्हाधिकारी कार्यालया कडून आयोजित कार्यक्रमात सेवानिवृत्त प्रकाश जाधव यांची जिल्हाधिकारी डॉ.अभिजित राऊत यांनी सहपत्नीक स्वागत सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
देश सेवा प्रशासकीय सेवेनंतर आता माजी सैनिक प्रकाश जाधव यांनी तलाठी पदावरून सेवानिवृत्त झाल्यावर समाजसेवा करण्याचे ठरविले असून. याची सुरुवात दि.१० आगस्ट शनिवार रोजी मौजे गोंडजेवली तांड्याच्या शाळेवर स्वखर्चाने ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमांतर्गत पन्नास झाडांची लागवड करत आपल्या सामाजिक कार्याची सुरुवात केली आहे.या वेळी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सुभाष राठोड,सरपंच सुधाकर जाधव,जयसिंग राठोड, बालाजी जाधव, अप्पारावपेठ केंद्राचे एस.पी.कौड, प्रमोद रत्नाळीकर, मारोती राठोड,अप्पारावपेठ वनपरिक्षेत्र कार्यालयाचे वनरक्षक रघुनाथ वनवे पोलीस पाटील धारासिंग राठोड, दुर्गादास आडे, मनोज जाधव, लोकेश आडे,विठ्ठल जाधव, सुरेश राठोड,नायक बळीराम पवार,उत्तम महाराज,भिकू राठोड बस्वराज आचारे, आदींची उपस्थिती होती तर जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापक उत्तम बाबळे व सहशिक्षक दिलीप वाघमारे यांनी उपस्थित प्रमुख पाहुण्याचे सत्कार करून आभार व्यक्त केले सदरील वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहशिक्षक दिलीप वाघमारे यांनी परिश्रम घेतले.तर या विध्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्व पटवून दिले.वृक्षारोपण कार्यक्रम दरम्यान शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्साहात सहभाग नोंदविला होता.
नांदेड येथे नुकतेच संपन्न झालेल्या महसूल पंधरवडा या कार्यक्रमात माजी सैनिक सेवानिवृत्त तलाठी प्रकाश जाधव यांचे जिल्हाधिकारी डॉ.अभिजित राऊत यांच्या हस्ते सहपत्नीक इस्लापुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सौ.दिव्याबाई जाधव यांचे स्वागत सत्कार करून पुढील शुभेच्छा देण्यात आले. यावेळी नांदेड जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी मीनल करनवाल व सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली मॅडम सह महसूल अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.