हिमायतनगर। तालुक्यातील वडगाव शिवारातून कोणीतरी अज्ञात चोरट्याने सात पोलचे नुकसान करून विद्युत वापराचा जरमन तार चोरून नेला आहे. हि घटना दि. ५ च्या मध्यरात्री घडली असून दि. ६ मंगळवारी सकाळी ही चोरीची उघडकीस आली आहे.


तालुक्यातील वडगाव शिवारात विद्युत महावितरण कंपनीकडून पोल उभारणीचे काम सुरू आहे. या दरम्यान कामांसाठी पोल जरमन तार व इतर साहित्य घटनास्थळी टाकण्यात आले होते. व काहिं उभारण्यात आले होते. या दरम्यान रात्री अंधाराचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी सात पोलचे नुकसान करून, विद्युत कंपनीचे पोलवरील जरमन वायर अंदाजे किंमत २५ हजारांचा माल चोरून नेला आहे.


सकाळी हि चोरीची घटना उघडकीस आल्यानंतर हिमायतनगर येथील विद्युत महावितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता शुभम सुरेश कळसकर वय ३० वर्ष व्यवसाय महावितरण कंपनीत नौकरी यांनी हिमायतनगर पोलीस ठाण्याला दिलेल्या फिर्यादीवरून गुरन. २०४/२०२४ कलम ३०३, ( २ ), ३२४ ( ४ ), ३२४ ( ५ ) भारतीय न्याय संहिता २०२३ कायद्याप्रमाणे हिमायतनगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पो. काॅ. सरकुंडे हे करीत आहेत.




