नांदेड। पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने गोदावरी नदीच्या संवर्धनासाठी ८७ कोटी १३ लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून, संवर्धनाचे काम सुरू झाले आहे. या कामासाठी राज्यसभा सदस्य खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता . खा. डॉ.गोपछडे यांच्या पाठपुराव्याला यश आले असून 87 कोटी तेरा लक्ष रुपयाचा निधी मंजूर झाला आहे.
नाशिकमधील त्र्यंबकेश्वरहून उगम पावलेल्या गोदावरी नदीवर महाराष्ट्रासह तेलंगण, आंध्र प्रदेशामधून वाहत असून, लाखो हेक्टर जमिनीवरील सिंचन गोदावरीच्या पाण्यावर विसंबून आहे. शिवाय हजारो गावातील लाखो नागरिकांची जीवन आहे गोदावरीच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यादृष्टीकोनातून गोदावरीचे पाणी स्वच्छ राहण्यासाठी खासदार अजित गोपछडे यांनी प्रयत्न केले आहेत. यासाठी केंद्र सरकारच्या जल शक्ति मंत्रालयाच्या सचिव श्रीमती देवश्री मुखर्जी यांच्याकडे पत्राद्वारे केंद्र सरकारने संवर्धनाची मागणी केली होती.
नांदेडमधील शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पाची उंची वाढविण्याचीही मागणी करण्यात आली होती. या संदर्भात केंद्र सरकारच्या जलशक्ति मंत्रालयाने राज्य सरकारला विनंतीपत्र पाठविले आहे. तर गोदावरी नदीच्या संवर्धनासाठी 87 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे . या निधीतून गोदावरी नदीच्या शुद्धीकरणासाठी , संवर्धनासाठी आणि आवश्यक बाबींची दुरुस्ती करण्यात येणार असल्याची माहिती खा. अजित गोपछडे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.