नांदेडधार्मिक

श्रावण मासानिमित्त शिवजयंती उत्सव समिती मांडवी तर्फे दिनांक 17 ऑगस्ट रोजी मांडवी ते उनकेश्वर पदयात्रेचे आयोजन -NNL

किनवट, परमेश्वर पेशवे। हिंदू धर्मामध्ये पवित्र मास म्हणून श्रावण महिन्याकडे बघितले जाते . या श्रावण मासामध्ये भगवान शिवशंकराची आराधना उपासना केली जाते. हजारो भाविक भक्त गण श्रावण सोमवारी वेगवेगळ्या शिवमंदिरामध्ये शिवालयामध्ये गर्दी करत असतात. तर काही शहरातून गावामधून पायी कावड यात्रा ही काढली जाते.

दरवर्षी प्रमाणे यावर्षी शिवजयंती उत्सव समिती मांडवी च्या वतीने मांडवी ते उनकेश्वर असे पायी कावड यात्रेचे भव्य दिव्य आयोजन दिनांक 17 ऑगस्ट रोजी करण्यात आले आहे. पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी या पायी कवडयात्रेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष मुकेश शेंडे, सचिव हर्षल शेंडे, शिवभक्त दीपक जयस्वाल, गजानन शेंडे, सुनील राठोड सर, सुनील दादा श्रीमनवार चंदन मांडण, अमोल जयस्वाल, पिंटू जयस्वाल, आशिष जयस्वाल, नितीन ठाकूर, या सर्व शिवभक्तांनी या पायी कावड यात्रेमध्ये परिसरातील सर्व भाविक भक्तांना सहभागी होण्यासाठी जाहीर आवहान केले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button