नांदेड जिल्ह्यात पाच वर्षांच्या चिमुकलीला चॉकलेटचे अमिष दाखवून अत्याचार; गुन्हा दाखल -NNL

0

नायगाव/नांदेड। जिल्ह्यातील नायगाव येथे एका पाच वर्षांच्या चिमुरडीला चॉकलेटचे अमिष दाखवून दुकानात अत्याचार करणा-या नराधमाविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी दुकानदारास अटक करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील मौजे मरवाळी परिसरात गुरुवार दिनांक 06 रोजी एका पाच वर्षांच्या चिमुरडीला चॉकलेटचे अमिष दाखवून दुकानात अत्याचार केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी महेबुब उर्फ सोहेल मुस्तपा शेख या नराधमाला शनिवारी दिनांक 8 रोजी ताब्यात घेण्यात आले आहे.

नायगावातील मरवाळी येथील महेबुब शेख याच्या दुकानात निरमा पुडा घेण्यासाठी पाच वर्षीय चिमुरडी आली होती. यावेळी तिला चॉकलेट देतो, म्हणून या नराधमाने दुकानाच्या आत बोलवले. आणि तिच्यावर अत्याचार केला. चिमुरडीने या घटनेबद्दल नातेवाईकांना सांगितले. पीडी5चिमिकलीचे वडील बाहेरगावी असल्याने कुटुंबियांनी शनिवारी नायगांव पोलिस ठाण्यात धाव घेतली. चिमुकलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार महेबुब शेख याच्या विरोधात पोस्को कायद्याच्या अंतर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here