करियरनांदेड

10th class exams are over : दहावीची परीक्षा संपली; ११ वी प्रवेशासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करा – शिक्षणाधिकारी माधव सलगर

नांदेड| इयत्ता 10 वीची परीक्षा 18 मार्च रोजी संपल्यानंतर आता विद्यार्थ्यांसमोर इयत्ता 11 वीच्या प्रवेशाचा महत्त्वाचा टप्पा उभा आहे. राज्यभर मागील वर्षाप्रमाणे यंदाही (सन 2026-27) इयत्ता 11 वीचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीनेच होणार असल्याने विद्यार्थ्यांनी व पालकांनी आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करून पूर्वतयारी ठेवावी, असे आवाहन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) माधव सलगर यांनी केले आहे.

लवकरच 11 वी प्रवेशासाठी नवीन ऑनलाईन पोर्टल कार्यान्वित होणार असून, त्यावर प्रथम महाविद्यालयांना नोंदणी, शाखा व विषयांची माहिती भरावी लागणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी पोर्टल सुरू होईल. त्यामुळे कॉलेज प्रशासन तसेच विद्यार्थ्यांनी वेळेत प्रक्रिया पूर्ण व्हावी यासाठी आधीच तयारी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

नांदेड जिल्ह्यात मागील वर्षी 256 महाविद्यालयांमधून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली होती. यंदाही त्याच पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

कॉलेज प्रशासनासाठी आवश्यक कागदपत्रे:

  • कॉलेज मान्यतेचे सर्व आदेश
  • अतिरिक्त तुकडी, शाखा व विषय मान्यता आदेश
  • माध्यम नमूद असलेले खाते मान्यता आदेश
  • मंडळ मान्यता आदेश
  • सन 2024-25 ची संचमान्यता व तुकडीनिहाय प्रवेश क्षमता
  • कॉलेजचे बँक तपशील
  • अल्पसंख्यांक दर्जा आदेश (असल्यास)
  • भौतिक सुविधा अभिलेखे
  • फी स्ट्रक्चर मान्यतेबाबत शाळा व्यवस्थापन समितीचा ठराव
  • इतर आवश्यक कागदपत्रे

विद्यार्थी व पालकांसाठी आवश्यक कागदपत्रे:

  • दहावीचे गुणपत्रक
  • शाळा सोडल्याचा दाखला / बोनाफाईड
  • डोमिसाईल प्रमाणपत्र
  • जातीचे प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • नॉन-क्रीमिलेयर प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • दिव्यांग प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • खेळाडू प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो

सर्व संबंधितांनी वेळेआधीच कागदपत्रांची पूर्तता केल्यास ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल आणि प्रवेश प्रक्रिया सुरळीत पार पडेल, असेही शिक्षणाधिकारी माधव सलगर यांनी स्पष्ट केले.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!