Wednesday, May 13

Tag: Education Officer Madhav Salgar

10th class exams are over : दहावीची परीक्षा संपली; ११ वी प्रवेशासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करा – शिक्षणाधिकारी माधव सलगर

10th class exams are over : दहावीची परीक्षा संपली; ११ वी प्रवेशासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करा – शिक्षणाधिकारी माधव सलगर

करियर, नांदेड
नांदेड| इयत्ता 10 वीची परीक्षा 18 मार्च रोजी संपल्यानंतर आता विद्यार्थ्यांसमोर इयत्ता 11 वीच्या प्रवेशाचा महत्त्वाचा टप्पा उभा आहे. राज्यभर मागील वर्षाप्रमाणे यंदाही (सन 2026-27) इयत्ता 11 वीचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीनेच होणार असल्याने विद्यार्थ्यांनी व पालकांनी आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करून पूर्वतयारी ठेवावी, असे आवाहन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) माधव सलगर यांनी केले आहे. लवकरच 11 वी प्रवेशासाठी नवीन ऑनलाईन पोर्टल कार्यान्वित होणार असून, त्यावर प्रथम महाविद्यालयांना नोंदणी, शाखा व विषयांची माहिती भरावी लागणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी पोर्टल सुरू होईल. त्यामुळे कॉलेज प्रशासन तसेच विद्यार्थ्यांनी वेळेत प्रक्रिया पूर्ण व्हावी यासाठी आधीच तयारी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. नांदेड जिल्ह्यात मागील वर्षी 256 महाविद्यालयांमधून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली हो...
error: Content is protected !!