नांदेडसोशल वर्क

Municipal Corporation : महानगरपालिकेत शहरी आपत्ती व्यवस्थापन समितीची आढावा बैठक संपन्न

नांदेड| महानगरपालिकेत आज दिनांक 27 मे 2025 रोजी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.महेशकुमार डोईफोडे यांच्या अध्यक्षतेखाली शहरी आपत्ती व्यवस्थापन समितीची आढावा बैठक पार पडली.

सदर बैठकीमध्ये शहरात सुरु असलेल्या विविध विकास कामांच्या सद्यस्थितीबाबत आढावा घेण्यात आला. तथापी शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण व महानगरपालिका यांनी एकमेकांशी समन्वय साधुन शहरातील अर्धवट असलेली कामे तात्काळ पुर्ण करावित असे निर्देश यावेळी मनपा आयुक्तांनी दिले आहेत, जेणे करुन मान्सुनमध्ये शहरातील सखल भागात पावसाचे पाणी न साचता त्याचा तात्काळ निचरा होण्यास सहकार्य होऊन नागरीकांची गैरसोय होणार नाही.

त्याचप्रमाणे शहरातील नाले सफाईच्या कामात जे काही अडथळे येतील ते काढून नाले प्रवाहित करण्या करिता संबंधितांना आदेश देण्यात आलेले आहेत. तसेच उर्वरीत नाले सफाईचे काम तात्काळ पुर्ण करण्याचे निर्देश सुध्दा देण्यात आले. शहरातील होर्डिंग बाबत क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सर्वे करून अनाधिकृत होर्डिंग वर कारवाई करण्याचे आदेश सुद्धा यावेळी देण्यात आले.

मनपा आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सदर बैठकीस श्री काळे ओ.गी. उपविभागीय अभियंता साबांवि नांदेड, श्री नरमीटवार एम.बी. उपविभागीय अधिकारी साबांवि नांदेड (उत्तर), श्री प्रमोद वा. क्षिरसागर अति. कार्यकारी अभियंता महावितरण उपविभाग नांदेड (1), श्री विजय घनबहाद्दुर कार्यकारी अभियंता महावितरण उपविभाग नांदेड(2), श्री नवनाथ सोनटक्के सहाय्यक अभियंता-2 साबांवि नांदेड, श्री शिवम सुनिल वाकोडकर सहाय्यक अभियंता नांदेड पाठबंधारे विभाग नांदेड (उत्तर) इत्यादी शहरी आपत्ती व्यवस्थापन समितीचे निमंत्रीत सदस्य उपस्थित होते.

तसेचया याव्यतिरीक्त शहरी आपत्ती व्यवस्थापन समितीचे महानगरपालिकेचे सदस्य श्री प.ला.आलुरकर सहाय्यक संचालक नगररचना, श्री जनार्धन पक्वान्ने लेखा व वित्त अधिकारी, सौ. सुप्रिया टवलारे उपआयुक्त (प्रशासन), श्री अजितपालसिंघ संधु उपआयुक्त तथा नगरसचिव, श्री नितीन दशरथ गाढवे उपआयुक्त (आपत्ती), श्री सुमंत पाटील शहर अभियंता, श्री गुलाम सादेख सहाय्यक आयुक्त (स्वच्छता विभाग), श्री सतीश ढवळे उप अभियंता (विद्युत), श्री विश्वनाथ स्वामी कार्यकारी अभियंता साबांवि, श्री दिलीप टाकळीकर उप अभियंता साबांवि, श्री प्रकाश कांबळे उप अभियंता (पा.पु. व यांत्रिकी), डॉ. मिर्झा फरहतउल्ला बेग (आपत्ती व्यवस्थापन अधिकारी तथा क्षेत्रिय अधिकारी, क्षे. का. क्र.6 श्रीमती निलावती डावरे क्षेत्रिय अधिकारी क्षे. का. क्र.1, श्री रावण सोनसळे क्षेत्रिय अधिकारी क्षे. का. क्र. 5, श्री वसीम तडवी (स्वच्छता विभाग), तसेच श्री किरण सुर्यवंशी क. अभियंता साबांवि मनपा, श्री संदीप पाटील क. अभियंता साबांवि आदींची उपस्थित होती.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button