नांदेड| महाराष्ट्र शासन कामगार कल्याण विभागाच्या कामगार कल्याण मंडळ विभागीय गट कार्यालय लेबर कॉलनी नांदेड येथे दि. 13 डिसेंबर 2024 शुक्रवार रोजी खुली बाल नाट्य स्पर्धा 2024-2025 पार पडली. या बाल नाट्य स्पर्धेमध्ये एकुण 12 बाल नाट्य संघ स्पर्धक सहभाग नोंदवून आपापले नाट्य सादरीकरण केले.
पैकी तीन विजेते स्पर्धक निवडण्यात येऊन रोख धनादेश प्रथम क्रमांक ललीत कला भवन लेबर कॉलनी नांदेड रुपये 2500/-, द्वितीय पारितोषिक कामगार कल्याण केंद्र हिंगोली 2000/-, तृतीय पारितोषिक कामगार कल्याण केंद्र सिडको नांदेड 1500/- रुपये, अभिनय मुले बक्षीस तीन स्पर्धक, अभिनय मुली बक्षीस तीन स्पर्धक, दिग्दर्शन बक्षीस तीन, प्रत्येकी 800, 600, 400 रोख धनादेश व प्रशस्तीपत्र आणि या स्पर्धेत सहभागी बालनाट्य कलावंत, कामगार कुटुंबिय व ईतर कलावंत 130 जणांना सहभाग प्रशस्तीपत्र उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वाटप करुन सन्मानीत करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त तथा सदस्य साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समिती महाराष्ट्र शासन मा.श्री. शिवा कांबळे हे होते तर विचारपीठावर प्रमुख अतिथी म्हणून भारत संचार निगम लिमिटेड नांदेडचे जनसंपर्क अधिकारी मा.श्री. उमेश जोशी, एस.टी. मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते मा.श्री. गुणवंत एच. मिसलवाड, गुणवंत कामगार कॉ. पंडीत तेलंग, रामदास पेंडकर, स्पर्धा परीक्षक राहुल जोंधळे, श्रीमती शर्वरी सकळकळे, श्रीमती रुपाली जोशी, कामगार कल्याण अधिकारी प्रसाद धस यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती. यावेळी गुणवंत एच. मिसलवाड, राहुल जोंधळे, श्रीमती सकळकळे यांची समयोचित भाषणे झाली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कामगार कल्याण अधिकारी प्रसाद धस यांनी केले तर सुत्रसंचालन सहाय्यक केंद्र संचालक ललीत कला भवन नांदेड विलास मेंडके, आभार प्रदर्शन कामगार कल्याण केंद्र संचालक वसमत विश्वनाथ साखरे यांनी मांडले.
हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी कामगार कल्याण केंद्र मुदखेडचे सहाय्यक केंद्र संचालक नागेश कल्याणकर, येळेगावचे सहाय्यक केंद्र संचालक प्रसाद शेळके, सहाय्यक केंद्र संचालक हिंगोलीचे हनमंत सवंडकर, मिल गेट नांदेड/ सेलू येथील केंद्र संचालक गजानन भोसीकर, केंद्र संचालक सिडको नांदेडचे शेषेराव फाळके, चौफाळा येथील केंद्र संचालक साईनाथ राठोड, सौ. सविता पांडे, अर्चना शिवनखेडकर, मंदा कोकरे, उषा गवई, अरुणा गिरी, नामदेव तायडे, रविंद्र जाधव यांनी मोलाचे परिश्रम घेतले. याप्रसंगी कामगार क्षेत्रातील कुटुंबिय व इतर समाज बंधु- भगिणी मोठ्या संख्येेने उपस्थित होते.