नांदेड| महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी डेपो) नांदेड आगाराच्या मध्यवर्ती बसस्थानकात 68 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन आगार कामगार- कर्मचार्यांच्यावतीने मोठ्या हर्षोल्हासात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम बसस्थानक प्रमुख यासीन हमीद खान यांच्या हस्ते भारतरत्न, संविधानाचे जनक, क्रांतीसूर्य, बहुजनोद्धारक, प.पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पमाला अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तद्नंतर या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक तथा वाहतुक नियंत्रक राजकुमार कांबळे, विजयकुमार आढाव यांनी सामूहिकरित्या बुद्धवंदना घेतली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत एच. मिसलवाड यांनी केले. ते प्रास्ताविकपर बोलताना आपल्या भाषणात म्हणाले की, तथागत भगवान गौतम बुद्धांनी पंचवर्गीय भिक्खुंना धम्मोपदेश देत प्रथम धम्मप्रवर्तन केले. यानंतर इ.स. पूर्व तिसर्या शतकात चक्रवर्ती अशोक सम्राटांनी बौद्ध धर्म स्विकारला. तेंव्हापासून या दिवसाला अशोका विजयादशमी म्हणून ओळखल्या जाते, असे प्रतिपादन केले. प्रमुख वक्ते म्हणून बोलताना ते पुढे आपल्या भाषणात म्हणाले की, 14 ऑक्टोंबर 1956 रोजी प.पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या तीन लाख अनुयायांसमवेत दीक्षाभूमी नागपूर येथे बौद्ध धम्म स्वीकारुन दीक्षा घेतली व धम्मचक्र प्रवर्तन केले. तेंव्हापासून संपूर्ण भारत देशामध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, याला 68 वर्षे झाली असेही ते यावेळी म्हणाले.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून बसस्थानक प्रमुख यासीन हमीद खान, कामगार नेते रघुनाथराव वाघमारे, वाहतुक निरीक्षक राजेश धनंजकर, आकाश भिसे, एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत एच. मिसलवाड, संयोजक राजकुमार कांबळे, विजयकुमार आढाव, वाहतुक नियंत्रक अॅड. आनंद तिगोटे, सौ. पायल बैस, आम्रपाली जमदाडे, माया थोरात, वर्षा हनवते, आम्रपाली मादळे, यशोदिप आटकोरे, विजय गायकवाड, सुरेश थोरात, बालाजी कांबळे, कुणाल तळणीकर, मंगेश कांबळे, श्याम वायवळ, मिलींद सावळे, मल्हारी वाघमारे यांची प्रमुख्र उपस्थिती होती. याप्रसंगी रा.प.म. कामगार- कर्मचारी, प्रवाशी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.