नांदेडसोशल वर्क

Kinwat Health office : आशा व गटप्रवर्तकांचा किनवट तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयावर मोर्चा

ASHA and group promoters march on Kinwat Taluka Health Officer’s office नांदेड| सीटू संलग्न आशा व गटप्रवर्तक फेडरेशनच्या वतीने ३० जून रोजी किनवट येथील तालुका आरोग्य अधिकारी यांच्या कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन निवेदन देण्यात आले. गोंडाराजे मैदान जवळील उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालय येथून दुपारी एक वाजता मोर्चा काढण्यात आला.

IMG 20250630 WA0024 Kinwat Health office : आशा व गटप्रवर्तकांचा किनवट तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयावर मोर्चा

९ जुलै रोजी देशव्यापी संपाच्या निमित्ताने नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार असून मोर्चाच्या दिवशी सर्व आशा आणि गटप्रवर्तक कामावर येणार नाहीत असे स्पष्ट पत्र तालुका आरोग्य अधिकारी आणि प्रधान सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग तसेच आयुक्त कुटुंब कल्याण व संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई यांना सीटू च्या वतीने देण्यात आले आहे.

IMG 20250630 WA0025 Kinwat Health office : आशा व गटप्रवर्तकांचा किनवट तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयावर मोर्चा

स्थानिक व राज्य – केंद्र स्तरावरील विविध मागण्या या मोर्चा मध्ये करण्यात आल्या आहेत. मोर्चाचे नेतृत्व जिल्हाध्यक्षा कॉ. उज्वला पडलवार, जिल्हा महासचिव कॉ.गंगाधर गायकवाड आणि उपाध्यक्षा कॉ. शिलाताई ठाकुर, जमसंच्या जिल्हाध्यक्षा कॉ.लता गायकवाड, कॉ. निर्मलाताई शिनगारे यांनी केले.

मोर्चा यशस्वी करण्यासाठी अनेक आशा ताईंनी प्रयत्न केले. तसेच ९ जुलै रोजी नांदेड येथे होणाऱ्या मोर्चा मोठ्या संख्येने सामील होण्याचा निर्णय घेण्यात आला. – कॉ. उज्वला पडलवार, जिल्हाध्यक्षा – आशा व गटप्रवर्तक फेडरेशन नांदेड जिल्हा.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!