स्वराज्य संघटना झी विरोधात आक्रमक -NNL

मुंबई। छत्रपती शिवाजी महाराज की जय व स्वराज्य संघटनेच्या नावाने घोषणाबाजी करतांना पोलिसांनी आवडल्याने आंदोलन आक्रमक झाले असून , पोलिसांनी शिविगाळ करीत जनावरासारखे कार्यकर्त्याना अटक केले आहे. यात कार्यकर्यांना डोक्याला हाताला मार लागला आहे. यामुळे झी विरोधात आंदोलन चिघळणार असल्याचे दिसून येत आहे.

मुंबई येथे हर हर महादेव चित्रपट झी मराठी वर प्रदर्शित करण्याविरोधात स्वराज्य संघटना आक्रमक झाली असून, आज मुंबई मधील कार्यालयाच्या समोर, झी च्या पत्रिकांची होळी करण्यात आली. स्वराज्यप्रमुख छत्रपती संभाजीराजेंच्या इशाऱ्यानंतरही झी ने सिनेमा प्रदर्शित करण्याच्या हट्टामुळे स्वराज्य च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तोडफोडीचा प्रयत्न केला परंतु पोलिस बंदोबस्तामुळे होळी करण्यात आली.

झी मराठी ला २४ तासांचा अल्टिमेटम देण्यात आला असून झी ने माघार घेतली नाही तर राज्यभरात झी ची वाहिने, कार्यालयांवर लक्ष करण्यात येईल व झी Boycott मोहीम घेवून झी विरोधात जनजागृती करण्यात येईल.

हर हर महादेव सिनेमामध्ये इतिहासाची मोडतोड करून चुकीचा इतिहास मांडण्यात आला असून त्यामुळे धारातीर्थी पडलेल्या मावळ्यांच्या इतिहासाला डाग लागत असल्यामुळे स्वराज्य ने सुरुवातीपासूनच सिनेमाला विरोध केला आहे. महाराष्ट्रभरातून जमलेल्या कार्यकर्त्यांनी झी च्या कार्यालया समोर चांगलाच गोंधळ घातल्याचे पहायला मिळाले.

यावेळी स्वराज्य चे पदाधिकारी करण गायकर, धनंजय जाधव, अंकुश कदम, माधव देवसरकर, आप्पासाहेब कुडेकर, मंगेश कदम ,गणेश कदम, केशव गोसावी, तिरुपती भगणुरे , सदानंद पुयड , राहुल गावडे , अशिष हिरे , रुपेश नाठे ,विनोद परांडे , द्वारकेश जाधव , नवनाथ शिंदे , दिनेश नरवडे , वैभव दळवी, राहुल लांडगे, विजय वाहुळे , प्रथमेश पुडे , महेश पुंडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!