Homeडॉ.दत्ता पाटील मोरे यांचा आरोग्य सेवेबद्दल एक्सलन्स अवॉर्ड ने सन्मान..NNL

डॉ.दत्ता पाटील मोरे यांचा आरोग्य सेवेबद्दल एक्सलन्स अवॉर्ड ने सन्मान..NNL

नांदेड। देगांव नगरीचे सुपुत्र व विद्यमान सरपंच डॉ. दत्ता पाटील मोरे यांना नुकतेच “एक्सलन्स अवॉर्ड ” ने सन्मानीत करण्यात आले.

मागच्या एक दशका पासून “नांदेड सिटी डेंटल केअर आणि हॉस्पिटल, श्रीनगर ” च्या माध्यमातून मराठवाडा, तेलंगणा व कर्नाटक मधील दंत व मुख रुग्णांना अत्यंत अद्ययावत व उच्च दर्जा च्या सुविधा देत असलेलं भव्य असं दंत व मुख रुग्णालय म्हणून नावारूपास आलेल्या ह्या हॉस्पिटल ला “बेस्ट मल्टी स्पेशालिटी डेंटल हॉस्पिटल (नांदेड ) ” असा सम्मान मिळाला आहे.

डॉ. दत्ता मोरे हे आरोग्य सेवा व समाज सेवेचे वृत्त घेऊन अतिशय तळमळीने आपले काम करणारे व ज्यांना जेव्हां गरज आहे त्यांना मदतीचा हात देणारे,सहकार्याना सोबत घेऊन काम करणारे व तसेंच सरपंच म्हणून गावकऱ्याचे प्रश्न समजून घेऊन त्यांना कुठे मदत करता येते तेव्हां मदत करण्यासाठी सदैव तत्पर असणारे व्यक्तीमत्व. वेगवेगळ्या योजनातून ग्रामविकास खात्याचा व वेगवेगळ्या कामातून गावांना अधिक चा विकासनिधी कसा घेऊन येता येईल त्यासाठी सतत आमदार, खासदार यांच्या कडे पाठपुरावा करून अखेर निधी गावासाठी समाज मंदिरासाठी व विविध योजनाच्या माध्यमातून केलेल्या आरोग्य व समाजसेवेच्या दुहेरी प्रयत्नामुळेच त्यांना यश मिळाले.

IMG 20221218 WA0003 डॉ.दत्ता पाटील मोरे यांचा आरोग्य सेवेबद्दल एक्सलन्स अवॉर्ड ने सन्मान..NNLत्यांच्या कार्याचा व समाज सेवेचा उद्याचा मराठवाडा व आयआयबी इन्सिट्युट ऑफ बायोलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांना एक्सलन्स अवॉर्ड ने नांदेड येथे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षाताई ठाकुर यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले. त्या प्रसंगी प्रमुख अतिथी मा . सचांलक गोविंद नांदेडे, प्रसिद्ध साहित्यिक सुरेश सावंत,संपादक श्री. राम शेवडीकर,मा. महापौर जयश्री पावडे,आनंदी विकास,प्रणिताताई चिखलीकर, पुनमताई पवार, आदी मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाला. डॉ. मोरे यांना मिळालेल्या पुरस्कार बद्दल मित्रमंडळ,गावकरी व त्यांच्या रुग्णां तर्फे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सदरील पुरस्कार हा माझ्या वर व माझ्या हॉस्पिटल टीम वर विश्वास ठेवून मला आरोग्य सेवेची संधी दिलेल्या सर्व रुग्णांना, स्नेही जणांना व ज्यांच्या प्रेरणे मुळे मी हे साध्य करू शकलो असे ज्येष्ठ समाजसेवक,शेतकरी, शेतमजूरांचा आधार,माझे बाबा श्री. बळवंत मोरे यांना समर्पित करतो अशी भावना डॉ. मोरे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना व्यक्त केली.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments