
नवीन नांदेड l नांदेड तालुक्यातील वडगाव येथे समाधी स्थळी जलनायक ,भारताचे माजी केंद्रीय गृहमंत्री कै.शंकररावजी चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण, माजी आमदार अमिता भाभी चव्हाण, आमदार ॲड.सुजया चव्हाण, यांच्या सह चव्हाण कुटूंबीय व उपस्थीत मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली.


दरवर्षी प्रमाणे याही वर्षी 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता वडगाव ता.जि.नांदेड येथे समाधी स्थळी खासदार अशोकराव चव्हाण यांच्या सह माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर आमदार जितेश अंतापुरकर ,माजी आमदार अमर भाऊ राजुरकर,डि.पी.सावंत, ओमप्रकाश पोकर्णा, नरेंद्र चव्हाण, गणपतराव तिडके, कृषी उत्पन्न बाजार समिती नांदेड सभापती संजय लहानकर, बालाजी पांडागळे, संतोष पांडागळे,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मंगाराणी अंबुलगेकर,माजी महापौर मंगला निमकर.

जयश्री धुळेकर, माजी नगरसेवक बालाजी जाधव ,डिंपल नबाब, बुंगई,माजी उपमहापौर सतीश देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे,भिमराव कल्याणे,सरपंच गंगाधर पाटील शिंदे संजय घोगरे, सतिश बसवदे,डॉ.नरेश रायेवार, डॉ.अशोक कलंत्री, दलीत मित्र माधवराव अंबटवार, नारायण कौलंबीकर , विनोद कांचनगिरे, रमेश वाघमारे, डॉ.रमेश नांदेडकर, भि.ना.गायकवाड, यांच्या सह जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राहुल कर्डिले, स्वारातीम विघापिठ कूलगुरू डॉ.चासकर,मनपा आयुक्त डॉ.महेश डोईफोडे, उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, तहसीलदार संजय वारकड मंडळ अधिकारी सुजलेगावकर यांनी समाधी स्थळी अभिवादन केले.
ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी वडगाव समाधी स्थळी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवला होता.




