नवीन नांदेड l जिल्हा परिषदेच्या शाळेत आजही दर्जेदार शिक्षण मिळत असुन राज्य स्तरावर या शाळेतील शिष्यवृत्ती मध्ये मिळविलेले यश हे नेत्रदिपक असल्याचे प्रतिपादन आमदार आनंदराव पाटील बोढारकर यांनी केले.


नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आनंदराव पाटील बोढारकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 2 ऑगस्ट रोजी शिवसेना शिंदे गटाचे सिडको शहरप्रमुख सुहास पाटील खराणे यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वसरणी येथे विध्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.


यावेळी नांदेड दक्षिण विधानसभा जिल्हा प्रमुख विनय पाटील गिरडे, शहरप्रमुख तुलजेश यादव,तालुका प्रमुख उध्दव पाटील शिंदे, तालुका प्रमुख अशोक मोरे,सेवानिवृत्त अधिकारी विश्वनाथ जटाळे, मुख्याध्यापक जाधव,युवासेना जिल्हा प्रमुख अमोद साबळे ,पोलीस पाटील लवकुश अवनुरे, केंद्रप्रमुख यांच्या सह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.


यावेळी जिल्हा परिषद शाळेच्या विध्यार्थी असुन आजच्या स्पर्धेच्या युगातही जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी गुणवत्तेसह, विविध स्पर्धा,अभ्यासक्रम यांच्ये दैनंदिन ज्ञान देऊन गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केले जात असल्याचे सांगून ईतर मोठ्या शाळेच्या तुलनेत आजही जिल्हा परिषद शाळेच्यी गुणवत्ता कायम असल्याचे सांगितले.

शाळेतील शुध्द पिण्याच्या पाण्यासाठी फिल्टर टॅक,मैदानात पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम लवकरच हाती घेऊन लवकरात लवकर शाळेत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येईल असे सांगितले.
शिवसेना जिल्हाप्रमुख विनय पाटील गिरडे यांनी शाळेच्या गुणवत्ता बाबत व शाळेतील प्रलंबित समस्या बाबत सोडविण्यासाठी प्रयत्न शिल असल्याचे सांगितले यावेळी वाढदिवसाच्या निमित्ताने शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रम सुत्रसंचलन मारोती धुमाळ व सहशिक्षक पांंम्पटवार यांनी केले,या कार्यक्रमास शालेय साहित्य समितीचे पदाधिकारी व गावातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी नृत्य करून सादरीकरण केले तर अंध विद्यालय वसरणीचा विध्यार्थ्यांना जय महाराष्ट्र गिताचे सादरीकरण केले,यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.


