HomeनांदेडBlack market of sand from sand depot | बिलोली तालुक्यातील सगरोळी येथील...

Black market of sand from sand depot | बिलोली तालुक्यातील सगरोळी येथील रेतीच्या डेपोतून रेतीचा काळा बाजार – NNL

नांदेड| घरकुल लाभधारकांना अल्प दरात रेती मिळावी यासाठी चालू करण्यात आलेल्या बिलोली तालुक्यातील सगरोळी येथील रेतीच्या डेपोतून महसूलच्या संबंधित अधिकारी यांच्या आशीर्वादाने डेपोतील रेतीचा काळा बाजार केला जात असल्याची ओरड होऊ लागली असून, गरजूना मात्र याचा कोणताही फायदा होत नसल्याचे बोलले जात आहे.

सर्व सामान्य लोकांना व घरकुल लाभधारकांना अल्प दरात रेती मिळावी यासाठी राज्य सरकारने शासकीय रेती डेपो योजना अमलात आणली. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील सगरोळी प्रशासनाने शासकीय रेती डेपोची निर्मिती केली. पण डेपोचा फायदा गरजूना होताना दिसत नाही. सध्या महसूल प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी आंदोलन करत आहेत. त्यामुळे शासकीय डेपोवर तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक कुणीही फिरकत नाहीत. तरी देखील ऑनलाइनच्या नावाखाली रेती माफिया हे झिरोमध्ये रेती चालवत आहेत.

झिरो म्हणजे ब्लॅक मध्ये विकत असून, ही रेती तेलंगणा, कर्नाटक तसेच लातूर, सोलापूर या ठिकाणी जात आहे. महसूल प्रशासन सोडा पण पोलीस प्रशासन देखील याकडे दुर्लक्ष करत असल्याने शासनाच्या अल्प दरातील डेपो योजनेच्या नावाखाली रेतीचा काळाबाजार होताना दिसून येत आहे. परिणामी सर्व सामान्य लोकांना व घरकुल लाभधारकांना याचा लाभ मिळत नसल्याने दिसत आहे. शासनाच्या योजना केवळ स्वार्थी अधिकारी, कर्मचारी यांच्यामुळे धुळीस मिळत असून, याचा फायदा मात्र रेती माफियांना होत असल्याचे यावरून दिसून येत आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments