Homeक्राईमMahindra home finance । महिंद्रा होम फायनान्सला पंधरा हजाराचा दंड; नांदेड ग्राहक...

Mahindra home finance । महिंद्रा होम फायनान्सला पंधरा हजाराचा दंड; नांदेड ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिला आदेश -NNL

श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। घर बांधकामासाठी घेण्यात आलेले हौसींग लोन देताना चुकीचे कारण देणे,ग्राहकास आर्थिक,मानसिक त्रास देणे , ग्राहकासी असभ्य वर्तन करणे, सक्तीने हप्ता वसुली करणे इत्यादी गैरव्यवहार प्रकरणी महिंद्रा रूरल हौसींग फायनान्स लि,शाखा माहूर ला ग्राहक तक्रार निवारण आयोगाने १५ हजाराचा दंड व ७०५०० रुपये देण्याचा महत्त्वपूर्ण आदेश दिला .

तक्रारदार पंडित दामोधर धुप्पे राहणार वानोळा ता.माहूर यांनी घर बांधकामासाठी महिंद्र फायनान्स कडे कर्ज म्हणून एक लाख रुपये यांचे प्रस्ताव दाखल केले होते ते एक लाख रुपये करारानुसार मंजूर करण्यात आले त्यापैकी २९५०० रुपये पहिला हप्ता दि,२१.२.२०१८ अर्जदारास देण्यात आला होता. बेसमेंट चे बांधकाम पूर्ण झाल्यावर बांधकामाचे फोटो व दहा कोरे चेक दिल्यावर उर्वरित ७०५०० रुपये अर्जदारास देण्यात येतील असे फायनान्स ने सांगितले होते त्यानुसार अर्जदाराने बेसमेंटचे बांधकाम करून कामाचे फोटो आणि दहा कोरे चेक महिंद्रा फायनान्स ला जमा केले होते.

परंतु फायनान्सने उर्वरित रक्कम अर्जदारास दिलीच नाही व दिलेल्या २९५०० रुपयांचा हप्ता वसुली म्हणून बँकेतून दहा हजार रुपये वसूल केले ही बाब अर्जदाराने कंपनीच्या लक्षात आणून दिले. कराराप्रमाणे अर्जदारास एक लाख रुपये मिळायला पाहिजे होते आणि त्या एक लाखाचा हप्ता थकीत राहिल्यास अर्जदारावर योग्य ती कार्यवाही कंपनी ने करावयास पाहिजे होती. मात्र कंपनीने पूर्ण कर्ज न दिल्याचे व कराराप्रमाणे पूर्ण रक्कम मिळाली नसल्याचे व ती रक्कम मिळेपर्यंत पुढील हप्ते भरणार नसल्याचे लेखी कळविण्यात आले होते.

परंतु फायनान्स कंपनीने अर्जदाराच्या लेखी तक्रारीवर विचार न करता अर्जदारास फोन करणे, मेसेज पाठवणे, राहत्या घरी येऊन सक्तीने हप्ता वसुली करीता त्रास देने, बँकेतील रक्कम परस्पर हप्तापोटी कपात करणे इत्यादी चुकीचे व्यवहार फायनान्यने अर्जदारांसोबत केले होते या गैरव्यवहार व दमदाटी प्रकरणी तक्रार माहूर पोलीस स्टेशनला ही देण्यात आली होती पोलीस स्टेशन ने सदरचा मुद्दा ग्राहक मंच निवारण आयोगाशी निगडित असल्याचे सांगून महिंद्रा होम फायनान्स ला यापुढे अर्जदाराची सक्तीची वसुली करू नये, दमदाटी करू नये अशा सूचना दिल्या होत्या.

अर्जदार पंडित धुप्पे यांनी दि,७.१०.२०२० रोजी नांदेड येथील ग्राहक तक्रार निवारण आयोगामध्ये रितसर तक्रार दिली होती. आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांनी सर्व बाबी पडताळून बघितल्या आणि अर्जदार हा करारानुसार एक लाख रुपयाचे कर्ज मिळण्यास कायदेशीर हकदार आहे त्याचा कायदेशीर हक्क कायम ठेवून अर्जदारास उर्वरित ७०५०० रुपये आणि अर्जदारास मानसिक व आर्थिक त्रास दिल्यामुळे दहा हजार रुपये दंड आणि दावा खर्च पाच हजार रुपये आदेश दिल्याच्या तारखेपासून ४५ दिवसाचे आत देण्याचा महिंद्रा फायनान्स कंपनी नी अर्जदारास द्यावा.

असा निकाल दिला व दि,१९ जुलै रोजी तक्रार निकाल प्रत तक्रार दारास दिली आहे , जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष राहुल पी. पाटील, सदस्य श्रीमती शलाका पी.ढमढेरे, ज्ञानेश्वर एस. पवार यांनी दिला आहे .तक्रारदाराची बाजू ॲ,अविनाश चौधरी यांनी तर महिंद्रा होम फायनान्स कंपनीचे वकील ॲ, म.मोहीओदिन मोईद यांनी बाजू मांडली.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments