नांदेड| 15 वर्षांपासून आपले संपूर्ण आयुष्य योग साधनेच्या माध्यमातून नि:शुल्क पणे समाजाला सशक्त व निरोगी बनविण्याचे शिवधनुष्य पेलणारे सीताराम सोनटक्के यांची शिबीर घेण्याची पद्धत म्हणजे प्रति पतंजली हरिद्वारची प्रचिती व अनुभूती येण्यासारखे आहे असे प्रतिपादन हडको पतंजली नित्य योग शाखेचे योग शिक्षक बालाजी वारखड यांनी केले. येत्या 1 जून 2025 पर्यंत सबंध नांदेड जिल्ह्यात एकूण 101 विविध ठिकाणी योग शिबीर आयोजित करण्याचा संकल्प पतंजली महाराष्ट्र प्रांत प्रभारी दिनेश राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत नांदेड येथे झालेल्या पतंजली जिल्हा कार्यकारिणी विशेष बैठकीत घेण्यात आला.
यानुषंगाने जिल्ह्याभरात विविध ठिकाणी शिबीर आयोजनाचे नियोजन अनिल अमृतवार व इतर पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शना खाली सुरु आहे. या उपक्रमा अंतर्गत नांदेड येथील सिडको हडको व श्री बालाजी मंदिर ट्रस्ट च्या वतीने 7 दिवसाचे शिबीर नुकतेच संपन्न झाले. या शिबिरास भारत स्वाभिमान प्रांत सह प्रभारी अनिल अमृतवार, महिला पतंजली जिल्हा प्रभारी सविताताई गबाळे, पतंजली जिल्हा संघटन मंत्री हनुमान ढगे, भारत स्वाभिमान जिल्हा प्रभारी राम शिवपनोर, आंतरराष्ट्रीय सुवर्ण पदक प्राप्त योगपट्टू योग चॅम्पियन किशन भवर तसेंच नांदेड भूषण योग शिक्षक सीताराम सोनटक्के यांनी या शिबिराला हजेरी लावली.
या शिबिरास शेकडो अबालवृद्ध पुरुष व महिला योग साधकांची उपस्थिती होती. याप्रसंगी सिडको हडको व बालाजी मंदिर ट्रस्ट यांच्यावतीने योग शिक्षक सिताराम सोनटक्के, नित्य योग भक्ति लॉन्स चे उपाध्यक्ष सदाशिवराव बुठले पाटील, तसेच प्रांत सदस्यत्व व जिल्हा पालकत्व तथा उद्योजक पंढरीनाथ कंठेवाड यांच्या प्रमुख उपस्थिती सह भक्ती लॉन्स चे योगशिक्षक राम जनकवाडे, रुखमाजी मुदखेड, किरण मुत्तेपवार, मुंजाजी भोकरकर, मीडिया प्रमुख मकरंद पांगरकर, योगशिक्षिका सौ. रंजना सिताराम सोनटक्के, सौ. उज्वला जनकवाडे, सौ. स्नेहा मोहकर आदींचा यावेळी यथोचित सत्कार करण्यात आला.
शिबिर यशस्वी करण्यासाठी सिडको हडको शाखेचे योगशिक्षक बालाजी वारखड, श्री बालाजी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अरुण दमकोंडवार, मा. नगरसेविका बेबीताई गोपीले, सतीश कौटिकवार, राखीताई भंडारी, विभावरी देशमुख, शैलेश पालदेवार, सतीश पाटील, भास्कर पोदारे, वासवी क्लबचे सचिव बालाजी कवटीकवार, ललिता ताई कदम, भागवत भातलवंडे , सी एम न्यूज चे संजीवकुमार गायकवाड व योग साधक आदींनी परिश्रम घेतले.