नांदेड, अनिल मादसवार| 13 जानेवारी रोजी होणारा माझा वाढदिवस मी साजरा करणार नाही. कारण सध्या यंदा ९ जून २०२५ रोजी हदगाव हिमायतनगर तालुका परिसरात झालेल्या वादळवाऱ्यांमुळे, केळी, पपई, ऊस आणि इतर पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, शेतकरी अत्यंत संकटात सापडले आहेत. अशा कठीण प्रसंगी, आपण सर्वांनी त्यांच्या सोबत संवेदना व्यक्त करणे हे आपले कर्तव्य आहे. त्यामुळे यावर्षी माझा वाढदिवस साजरा करण्यात येणार नाही. त्यामुळे वाढदिवसा दिवशी माझ्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्ते, हितचिंतक यांनी कि=ओनीही हार तुरे आणू नये मी कसल्याही प्रकारच्या शुभेच्छा स्वीकारणार नाही असे आवाहन आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी केले.


माझ्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी आपल्याकडून मनापासून शुभेच्छा, प्रेम, आशीर्वाद मिळतात. त्याबद्दल मी आपला सदैव ऋणी आहे. मात्र, यंदा ९ जून २०२५ रोजी आपल्या परिसरात आलेल्या वादळवाऱ्यांमुळे, केळी, पपई, ऊस आणि इतर पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी अत्यंत संकटात सापडले आहेत. शेतकऱ्यांच्या तोंडचा घास निसर्गाने व अवकाळी वादळाने हिरावून घेतला आहे. एकीकडे शेतकरी माझा मे बाप जगाचा पोषिंदा फक्त सरकारच्या मदतीच्या आशेवर डोळ्यात अश्रू घेऊन पाहत आहे. अशा कठीण प्रसंगी, आपण सर्वांनी त्यांच्या सोबत संवेदना व्यक्त करणे हे आपले कर्तव्य आहे. त्यामुळे यावर्षी माझा वाढदिवस साजरा करण्यात येणार नाही.


मी स्वतः शेतकऱ्याचा लेक असून, या संकटाचे गांभीर्य मला पूर्णपणे समजते. शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तसेच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन शासनाकडे निवेदन दिले आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि आशीर्वादाने मी नेहमीच जनतेच्या सेवेसाठी कार्यरत आहे यासाठी आपणा सर्वांना नम्र विनंती आहे की, वाढदिवसानिमित्ताने कुणीही हार, तुरे, पुष्पगुच्छ, केक आणू नये. तसेच कोणत्याही स्वरूपात बॅनर आदी लावून वाढदिवस साजरा करू नये. जोपर्यंत माझ्या शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत मी वाढदिवस साजरा करणार नाही असे म्हणत शेतकरी बंधूंच्या संकटात आपण सहभागी होऊ या असे आवाहन देखील हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी नांदेड न्यूज लाइव्हच्या माध्यमातून केले आहे.




