नवीन नांदेड l स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व शहीद भगतसिंग महाविद्यालय किल्लारी जिल्हा लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या सेंटर झोन बॉक्सिंग या क्रीडा प्रकारात वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक प्राप्त केले.


ओमकार मारताळे (५५ ते ६० कि.ग्रॅ.) आणि मेघराज गायकवाड याने (६५ ते ७० कि.ग्रॅ.) फुल गोल्ड मेडल मिळवत यश संपादन केले. बी.ए. तृतीय वर्षाचा ठाकूर रोहन (५०-५५) ब्रांझ देवा पुयड ( ६५ ते ७०) कि.ग्रॅ. वजन गटात सिल्वर मेडलचा मानकरी ठरला.
या यशाबद्दल श्री सेवादास शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कर्मयोगी डॉ.नानासाहेब जाधव, कोषाध्यक्ष ॲड.प्रा.श्रीनिवास जाधव, प्राचार्य डॉ.शेखर घुंगरवार, उपप्राचार्य डॉ.व्ही.आर.राठोड यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील शारिरीक शिक्षण विभागप्रमुख व प्रभारी क्रीडा संचालक डॉ.साहेबराव मोरे आणि शारीरिक शिक्षण विभागाचे प्रा.डॉ.राहुल सरोदे यांनी मार्गदर्शन केले.




