MLA Baburao Kadam Kohlikar : वाढदिवस साजरा करणार नाही ; कुणीही हार तुरे आणूनये – आमदार बाबुराव कदम कोहळीकर
नांदेड, अनिल मादसवार| 13 जानेवारी रोजी होणारा माझा वाढदिवस मी साजरा करणार नाही. कारण सध्या यंदा ९ जून २०२५ रोजी हदगाव हिमायतनगर तालुका परिसरात झालेल्या वादळवाऱ्यांमुळे, केळी, पपई, ऊस आणि इतर पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, शेतकरी अत्यंत संकटात सापडले आहेत. अशा कठीण प्रसंगी, आपण सर्वांनी त्यांच्या सोबत संवेदना व्यक्त करणे हे आपले कर्तव्य आहे. त्यामुळे यावर्षी माझा वाढदिवस साजरा करण्यात येणार नाही. त्यामुळे वाढदिवसा दिवशी माझ्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्ते, हितचिंतक यांनी कि=ओनीही हार तुरे आणू नये मी कसल्याही प्रकारच्या शुभेच्छा स्वीकारणार नाही असे आवाहन आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी केले.
माझ्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी आपल्याकडून मनापासून शुभेच्छा, प्रेम, आशीर्वाद मिळतात. त्याबद्दल मी आपला सदैव ऋणी आहे. मात्र, यंदा ९ जून २०२५ रोजी आपल्या परिसरात आलेल्या वादळवाऱ्यांमुळे, केळी, पपई, ऊस ...
