हदगाव, शेख चांदपाशा| परभणी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोरील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या आरोपीच्या पाठीमागे मास्टरमाईड कोण आहे. याची कायदेशीर चौकशी करण्यासाठी सीआयडी नेमण्यात यावे व पडद्याआड असणाऱ्या आरोपीवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी हदगाव येथील आंबेडकरी समाज बांधवांनी तहसीलदार सुरेखा नांदे यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.
परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील संविधानाची प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली. याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटत असून, ठिकठिकाणी मोर्चे व आंदोलन करण्यात येत आहेत. आज १२ डिसेंबर रोजी हदगाव येथील सर्व समाज बांधव तहसील कार्यालयाच्या समोर जमा होऊन तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन सादर केले. या निवेदनात म्हटले आहे की, या प्रकरणातील आरोपीच्या पाठीमागे कोण आहे. याची सीआयडी मार्फत आरोपीचा शोध घ्यावा व त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी.
महाराष्ट्रातील सर्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे. परभणी येथील संविधान प्रतिकृतीच्या विटंबनेच्या निषेधार्थ निघालेल्या आंबेडकरी मोर्चात गालबोट लावण्याच्या हेतूने मोर्चात घुसून जाळपोळ व इतर प्रकारची नासधूस करणाऱ्या जातीवादी लोकांचा शोध घेण्यात यावा. विटंबना होण्याच्या एक दिवस अगोदर परभणी शहरांमध्ये निघालेल्या हिंदू मोर्चात भडकाऊ भाषण कोणी केले आहे का…? त्या भाषणाने प्रेरित होऊन त्यांनी हा प्रकार केला आहे का..? याचा सुद्धा शोध घेण्यात यावा. परभणी शहरातील पोलिसांने आंबेडकरी जनतेस धरपकड लाठी चार्ज करीत आहेत हे प्रकार ताबडतोब थांबविण्यात यावा. बौद्ध समाजातील विद्यार्थ्यांना व इतर व्यक्तींना विनाकारण आरोपी करण्यात येऊ नये.
संबंधित प्रशासनाने परभणी शहर व जिल्ह्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आंबेडकरी कार्यकर्त्यासोबत तात्काळ बैठक घेण्यात यावी. हदगाव शहरामध्ये असलेल्या संविधान प्रतिकृती पुतळ्याच्या समोर सीसीटीव्ही कॅमेरा ताबडतोब बसवण्यात यावा. वरील सर्व मागण्या आठ दिवसांमध्ये मंजूर नाही झाल्यास आंबेडकरी जनतेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा व निवेदन हदगाव शहर व तालुक्यातील सर्व आंबेडकरी समाजाच्या वतीने हदगाव तहसीलदार सुरेखा नांदे यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले आहे.