Inquire through CID : परभणी येथील घटनेच्या आरोपीच्या पाठीमागे कोण..? सीआयडी मार्फत चौकशी करा -समाज बांधवांचे निवेदन -NNL
हदगाव, शेख चांदपाशा| परभणी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोरील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या आरोपीच्या पाठीमागे मास्टरमाईड कोण आहे. याची कायदेशीर चौकशी करण्यासाठी सीआयडी नेमण्यात यावे व पडद्याआड असणाऱ्या आरोपीवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी हदगाव येथील आंबेडकरी समाज बांधवांनी तहसीलदार सुरेखा नांदे यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.
परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील संविधानाची प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली. याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटत असून, ठिकठिकाणी मोर्चे व आंदोलन करण्यात येत आहेत. आज १२ डिसेंबर रोजी हदगाव येथील सर्व समाज बांधव तहसील कार्यालयाच्या समोर जमा होऊन तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन सादर केले. या निवेदनात म्हटले आहे की, या प्रकरणातील आरोपीच्या पाठीमागे कोण आहे. याची सीआयडी मार्फत आरोपी...
