नांदेड| स्वातंत्र्यपूर्वकाळापासून देशप्रेम व जनहित,धर्मनिरपेक्ष भारत देशासाठी कार्यरत असलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये श्रेष्ठीने आपणांस दिलेल्या पदाच्या माध्यमातून पक्षसंघटनवाढीसह जनविकासाला प्रथम प्राधान्य देऊन कर्तव्यतत्पर राहू व पक्षश्रेष्ठीचा विश्वास सार्थ ठरवू अशी ग्वाही नांदेड शहर जिल्हा काॅग्रेस कमिटीचे नवनियुक्त शहर जिल्हा कार्याध्यक्ष महेश देशमुख तरोडेकर यांनी दिली.
महाराष्ट्र प्रदेश काॅग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आ.नानाभाऊ पटोले यांच्या शूभहस्ते व नांदेडचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव पाटील चव्हाण,आ.मोहन हंबर्डे,शहर जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत नांदेड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या शहर जिल्हा कार्याध्यक्षपदी युवा नेतृत्व महेश देशमुख तरोडेकर यांची नुकतीच नियुक्ती करुन त्यांना तसे,नियुक्तीपत्र मुंबई प्रदेश कार्यालयात नुकतेच प्रदान करण्यात आल्यानंतर त्यांचे मुळ गांव असलेल्या तरोडा (बु.) सह नांदेड शहरात नवचैतन्य निर्माण झाले असून प्रभाग क्रमांक २ तरोडा (बु.) येथील महाविकास आघाडीतील पदाधिकाऱ्यांसह निष्ठावंत कार्यकर्त्यांनी त्यांचे फटाक्याच्या आतीषबाजीसह एकमेकांना पेढे भरवून जंगी स्वागत केले.
युवक काॅग्रेसचे शहर जिल्हा उपाध्यक्ष माणिकराव देशमुख तरोडेकर यांच्या पुढाकारातून घेतलेल्या या कार्यक्रमास राष्ट्रवादी किसान सभेचे मा.प्रदेश प्रतिनिधी लक्ष्मणराव मा.भवरे,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपशहरप्रमुख बंडू देशमुख,अशोक दांडगे, राम देशमुख,सुरज सोनेकर,राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाचे प्रभाग अध्यक्ष व पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हा सरचिटणीस अमित कांबळे,अशोक दांडगे,गजानन देशमुख,शिवराज कांबळे,सुरज जाधव,अक्षय नळगे, गजानन जाधव,शैलेश गजभारे,किरण जाधव,सिद्धेश संगनवार,अमोल बंडे,शुभम जोगदंड,वैभव मोरे,यश गायकवाड, अनिकेत नरनवरे,देवानंद पारधे,शिव भालेराव, आनंदा रेडेवार,जीवक निखाते,पवन कुरवडे, नितीन देशमुख,अंकुश पवार,राजू परदेशी,महेश मिसे आदींसह महाविकास आघाडीतील काॅग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
नुकत्याच झालेल्या नांदेडच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी प्रणित काॅग्रेसचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव पाटील चव्हाण यांच्या विजयात योगदान देतांना तरोडा (बु.) व (खु) या दोन्ही मूळ गांवासह उपनगरांमध्ये तसेच,नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात मोठे मताधिक्य मिळवून देण्यात महेश देशमुख यांचा सिंहाचा वाटा आहे. महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांच्या स्थानिक सर्व पदाधिकाऱ्यांसह निष्ठावंतांना एकत्रित करून त्यांनी सक्षम प्रचारयंत्रणा राबविली होती.
त्यांच्या कार्याची पावती म्हणून दिलेल्या पदाच्या माध्यमातून काॅग्रेसने एका नवनेतृत्वाला संधी दिल्याचा आनंद असून यातून आगामी काळात या भागात काॅग्रेससह महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांना उभारी मिळेल असा आशावाद व्यक्त करुन मुख्यत्वे येथिल रस्ते,विज,पाणी या जनतेच्या मुलभूत गरजा पूर्णत्वास व जनसमस्या निवारणासाठीही प्रसंगी आंदोलनात्मक भूमिकेसाठी स्थानिकांना बळ मिळेल असा विश्वास याप्रसंगी माणिकराव देशमुख यांनी व्यक्त केला.