HomeनांदेडKanba popalar ; श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टतर्फे कानबा पोपलवार यांचा सत्कार

Kanba popalar ; श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टतर्फे कानबा पोपलवार यांचा सत्कार

हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| हिमायतनगर तालुक्यातील मौजे टेंभी येथील रहिवासी आणि साप्ताहिक नवपर्व चे मुख्य संपादक कानबा पोपलवार यांनी एलएल.बी. परीक्षेत प्रथम श्रेणीत यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशाचा गौरव करण्यासाठी परमेश्वर मंदिर ट्रस्ट तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.

सत्कार समारंभात मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष महावीर सेट श्रीश्रीमाळ, सचिव अनंता देवकते, तसेच सदस्य विलास वानखेडे उपस्थित होते. यावेळी ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी “अन्यायग्रस्तांना खऱ्या अर्थाने न्याय मिळवून देण्यासाठी वकिलीच्या माध्यमातून समाजसेवा करावी” अशी अपेक्षा व्यक्त केली.

पत्रकारिता क्षेत्रात दीर्घकाळ कार्यरत राहून समाजातील वंचित घटकांच्या प्रश्नांवर आवाज उठविणारे कानबा पोपलवार हे आता वकील म्हणून न्यायासाठी काम करतील, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

या प्रसंगी पत्रकार नागोराव शिंदेअनिल भोरेपंडित ढोणेसाप्ताहिक उद्याचा सूर्योदय चे संपादक पांडुरंग गाडगे, टेंभी येथील उपसरपंच आनंद मूतणेपाडअर्शद खान पठाण यांच्यासह परमेश्वर मंदिर ट्रस्टचे संचालक, ग्रामस्थ व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“अन्यायग्रस्त सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य करणार,” अशी ग्वाही यावेळी नूतन ऍडव्होकेट कानबा पोपलवार यांनी दिली.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments