Let’s give priority to people’s development along with party organization | काॅग्रेसच्या माध्यमातून तरोड्यातील पक्षसंघटनवाढीसह जनविकासाला प्राधान्य देऊ -NNL
नांदेड| स्वातंत्र्यपूर्वकाळापासून देशप्रेम व जनहित,धर्मनिरपेक्ष भारत देशासाठी कार्यरत असलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये श्रेष्ठीने आपणांस दिलेल्या पदाच्या माध्यमातून पक्षसंघटनवाढीसह जनविकासाला प्रथम प्राधान्य देऊन कर्तव्यतत्पर राहू व पक्षश्रेष्ठीचा विश्वास सार्थ ठरवू अशी ग्वाही नांदेड शहर जिल्हा काॅग्रेस कमिटीचे नवनियुक्त शहर जिल्हा कार्याध्यक्ष महेश देशमुख तरोडेकर यांनी दिली.
महाराष्ट्र प्रदेश काॅग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आ.नानाभाऊ पटोले यांच्या शूभहस्ते व नांदेडचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव पाटील चव्हाण,आ.मोहन हंबर्डे,शहर जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत नांदेड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या शहर जिल्हा कार्याध्यक्षपदी युवा नेतृत्व महेश देशमुख तरोडेकर यांची नुकतीच नियुक्ती करुन त्यांना तसे,नियुक्तीपत्र मुंबई प्रदेश कार्यालयात नुकतेच प्रदान करण्यात आल्यानंतर त्...
