कृषीनांदेडव्हिडीओ

Wild animals attack : अस्मानी संकटानंतर वन्य प्राण्यांचा हल्ला; रब्बीवरील शेतकऱ्यांची शेवटची आशाही धोक्यात

हिमायतनगर, अनिल मादसवार| अस्मानी संकटाने आधीच खचलेला शेतकरी वर्ग आता वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे पूर्णतः आर्थिक अडचणीत सापडला आहे. खरीप हंगामात झालेल्या पावसाच्या अनिश्चिततेमुळे मोठे नुकसान सहन केल्यानंतर रब्बी पिकांवरच शेतकऱ्यांची शेवटची आशा टिकून आहे. मात्र ही आशाही वन्य प्राणी उद्ध्वस्त करत असल्याने शेतकऱ्यांचे जगणे अवघड झाले आहे.

खरीपातील तुरीचे पीक जोमात आले असून शेंगा लागल्याने वन्य प्राणी शेतात घुसून सर्रास धुडगूस घालत आहेत. तर रब्बीतील हरभरा मोठ्या प्रमाणात निघाला असताना वानरांच्या टोळ्या व हरणांचे कळप दिवसा-ढवळ्या शेतात घुसून पिकांची नासधूस करत आहेत. या उपद्रवामुळे अनेक शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले असून काही ठिकाणी पीक हातातून गेले आहे.

शेतकरी दिवस-रात्र शेतात पहारा देत असूनही वन्य प्राण्यांचा बंदोबस्त होत नसल्याने मानसिक ताण वाढत आहे. पिकांचे नुकसान झाल्यास भरपाई मिळावी, तातडीने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात, अशी ठोस मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

जर वेळीच उपाययोजना केल्या नाहीत, तर रब्बी हंगामही धोक्यात येण्याची शक्यता असून शासन व वन विभागाने शेतकरी हित लक्षात घेऊन तात्काळ ठोस निर्णय घ्यावेत, अशी आर्त मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button