Sanjanatai ghadi ; हिमायतनगर तालुक्यातील मौजे पोटा येथे शिवसेना प्रवक्त्या संजनाताई घाडी यांचा सत्कार -NNL

हिमायतनगर। तालुक्यातील पोटा बु. येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या प्रवक्त्या सौ.  संजनाताई घाडी यांचा सत्कार करण्यात आला. संजनाताई घाडी ह्या स्त्री शक्तीचा जागर या कार्यक्रमानिमित्त नांदेड जिल्ह्य़ांच्या दौर्‍यावर आहेत.

माहूर येथील शक्तीपीठ रेणुका माता  दर्शनासाठी त्या जात असताना दि. २६ मौ.  पोटा बु.  येथे शिवसैनिकांच्या वतीने  त्यांचा सत्कार करण्यात आला. सत्कारा प्रसंगी सौ.  संजनाताई घाडी म्हणाल्या की,  महाराष्ट्र शासनाने लाडकी बहिण योजना सुरू केली. परंतू राज्यात दररोज महिलांवर अत्याचार होत आहेत.  ही बाब अतिशय दुर्दैवाची ठरते,  आणी म्हणून शासनाने  मुख्यमंत्री लाडकी बहिण योजने पेक्षा महिलांची सुरक्षितता महत्वाची असून, शासनाने आता मुख्यमंत्री माझी सुरक्षित बहिण ही योजना राबवावी.  जेणेकरून महिला सुरक्षित राहतील. अशी टिका प्रवक्त्या सौ. संजनाताई घाडी यांनी सत्कार सोहळ्या दरम्यान सरकारवर केली. शिवसैनिकांनी आगामी विधान सभा निवडणुकीसाठी शिवसैनिकांनी कामाला लागावे. असे अवाहनही सौ. संजनाताई घाडी यांनी केले.

यावेळी मुंबई महानगर पालिकेच्या नगरसेविका सोनमताई जामसुदकर, हिंगोली जिल्हा महिला आघाडीच्या संघटिका प्रियंकाताई घानेकर,  माजी सरपंच संतोष पुलेवार पोटेकर, ग्रामपंचायत सदस्या सौ. अश्विनीताई पुलेवार, युवासेना उपजिल्हाप्रमुख किशन फटाले, महिला आघाडी तालुका प्रमुख शिल्पाताई राठोड, युवती सेना जिल्हा समन्वयक प्राजक्ताताई गुंडेकर,संदिपराव देशमुख, गजानन सुर्यवंशी, माजी सरपंच अशोक जाधव, पत्रकार आनंद जळपते, बाळू खडके, विशाल अललवाड, माजी उपसरपंच राम गुंडेकर, विलास माने, अहेमद मिस्त्री, इब्राहिम शेख, सुर्यवंशी आदिंची प्रामूख्याने उपस्थिती होती.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button