नांदेड। ऑपरेशन फ्लश ऑऊट अंतर्गत अग्नीशस्त्र व जिवंत काडतुस बाळगणा-या दोन आरोपीतांना इतवारा गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे, ऐन सणासुदीच्या काळात अग्निशास्त्रं बाळगणाऱ्यावर कार्यवाही केल्याबद्दल वरिष्ठांनी अभिनंदन केले आहे.
अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक नांदेड, यांचे मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्हयात ऑपरेशन फ्लश आऊट (Operation Flush Out) कार्यवाही चालु आहे. त्याअनुषंगाने उपविभाग इतवारा गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार पोना-अर्जुन मुंडे, पोकों- चंद्रकांत स्वामी, श्रीराम दासरे, असे उपविभाग इतवारा हदीत पाहिजे फरारी मधिल आरोपी शोध घेणे कामी व अवैद्य धंदयावर कार्यवाही करणेकामी पेट्रोलींग करीत असताना आज दिनांक 14/09//2024 रोजी मिळालेल्या गोपनीय माहिती मिळाली.
यावरून पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण हद्दीत सावली धाब्याचे समोर दुध डेअरी रोडवर आरोपी नामे 1. बलबिरसिंघ प्रतापसिंघ जाधव वय 21 वर्ष व्यवसाय – मजुरी रा. गुरु रामदास यात्री निवास सी-25 नांदेड 2. शेख अदिल शेख शकील वय 25 वर्षे व्यवसाय – मजुरी रा. मदिना मस्जीद जवळ रहीमपुर नांदेड यांना ताब्यात घेवुन त्याची अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यातुन विनापरवाना बेकायदेशीर बाळगलेले 03 गावठी पिस्टल व 04 जिवंत काडतुस कि. 64,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. त्यावरुन पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण येथे शस्त्र अधिनियम कायदया प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोनि श्री विजयकुमार कांबळे हे करीत आहेत.
सदरची कामगीरी अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक नांदेड, खंडेराव धरणे अपर पोलीस अधिक्षक भोकर, सुरज गुरव, अपर पोलीस अधिक्षक नांदेड, सुशिलकुमार नायक उपविभागीय पोलीस अधिकारी उप विभाग इतवारा नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय इतवारा येथील गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार पोना-अर्जुन मुंडे, पोकॉ- चंद्रकांत स्वामी, श्रीराम दासरे, यांनी पार पाडली असुन वरिष्ठांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.