Blogतेलंगणानांदेडमहाराष्ट्रव्हिडीओ

Marathwada Telangana border ; मराठवाडा तेलंगाणा सिमारेषा असलेल्या वाशीजवळ दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक बंद – NNL

हिमायतनगर, अनिल मादसवार | मराठवाडा ते तेलंगणा जाण्यासाठी सोयीचा आणी जवळचा ठरणारा वाशी गावा शेजारील डोंगरात दरड कोसळल्याने हा मार्ग रहदारी साठी मोठे वाहनांना बंद झाला असून, दुचाकी वाहणे कशी तरी मार्ग काढीत येजा करीत आहेत. मात्र चारचाकी वाहणाला हा रस्ता सध्याला बंदच आहे. या ठिकाणी दरड कोसळलेल्या मलमा व दगड हटवून हा रस्ता रहदारीसाठी मोकळा करावा. अशी मागणी तेलंगणा महाराष्ट्रातील प्रवाशी नागरिक व वाहनदरकातून होत आहे.

IMG 20240808 WA0067 Marathwada Telangana border ; मराठवाडा तेलंगाणा सिमारेषा असलेल्या वाशीजवळ दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक बंद - NNL

मराठवाडा ते तेलंगणा राज्य रस्ता वाशी मार्गे कुबेर भैंसा, बासर, निर्मळ, निझामाबाद, पुढे हैद्राबाद जाण्यासाठी हा रस्ता प्रवाश्यांसाठी सोयीचा आणी जवळचा मानला जातो. तत्कालीन माजी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री श्रीमती सूर्यकांता पाटील यांच्या प्रयत्नातून ह्या अंतर्गत रस्त्याचे काम २५ वर्षांपूर्वी घाटाच्या अलीकडून पुर्ण झाले होते. तेव्हापासून या अंतर्गत रस्त्यावर कुण्याही राजकीय पुढाऱ्यांनी लक्ष घातले नाही. अलीकडच्या काळामध्ये या अंतर्गत रस्त्याची अवस्था अतिशय बिकट बनली आहे. वाशी गाव ते तेलंगणा सिमा याअंतर्गत २४ कोटी रूपयांचा विकास निधी मंजूर झाल्याचे कळते.

IMG 20240808 WA0066 Marathwada Telangana border ; मराठवाडा तेलंगाणा सिमारेषा असलेल्या वाशीजवळ दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक बंद - NNL

परंतू प्रत्यक्षात कामाला कुठलीच सुरुवात झाली नाही. सध्या या अंतर्गत रस्त्यावरून प्रवास करणे जोखमीचे ठरत आहे. या अंतर्गत रस्त्यावरून भैंसा ते हिमायतनगर तेलंगणा एसटी महामंडळाच्या पासींगच्या गाड्या दिवसातून चार वेळा येजा करतात. या मार्गावर प्रवाश्यांची संख्याही लक्षणीय आहे. परंतू रस्त्याची अवस्था अतिशय जिवघेणी ठरत आहे. याभागात गेल्या काही दिवसांपासून मोसमी पाऊस अधूनमधून कोसळत आहे. वारा पाऊस प्रमाणाने या ठिकाणी सिमारेषेनजीक असलेली दरड कोसळून हा रस्ता जवळपास अर्धा बंदच झाला आहे. अगोदरच या रस्त्याची अतंत्य दयनीय अवस्था झाली असून या रस्त्याने प्रवास करणे म्हणजे जीव धोक्यात टाकण्या जोगे आहे.

IMG 20240808 WA0070 Marathwada Telangana border ; मराठवाडा तेलंगाणा सिमारेषा असलेल्या वाशीजवळ दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक बंद - NNL

तरी देखील प्रवासाच्या आग्रहास्तव तेलंगणा महामंडळ बस चालून प्रवाश्याना सेवा देत आहे. मात्र या रस्त्यावरील दोनी राज्याच्या सीमारेषेवर दरड कोसळल्याने हा रास्ता जीव घेण्या ठरण्याची शक्यता नकार येत नाही दरड कोसळेल भाग हा वनविभागाच्या अखत्यारीत येत असल्याने वनविभागाने याची तात्काळ दाखल घेणे आवश्यक आहे. सध्या दुचाकी वाहणे कशीबशी मार्ग काढीत येत जात आहेत. परंतू चारचाकी वाहण धारकांची पंचायत झाली आहे. संबंधित विभागांच्या वरिष्ठांकडून या बाबीची गंभीर दखल घेऊन या ठिकाणी दरड कोसळून रस्त्यावर पडलेला मलमा व मोठमोठै दगड बाजूला सारून हा रस्ता रहदारीसाठी सुरळीत करावा. आणि यापुढे दरड कोसळण्याचा धोका होणार नाही यासाठी उपाय योजना कराव्यात अशी मागणी प्रवाश्यातून पुढे आली आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!