हिमायतनगर, अनिल मादसवार| संबंध भारतात एकमेव असलेल्या हिमायतनगर वाढोणा येथील इतिहासकालीन श्री परमेश्वर मंदिरात श्रावण मास उत्सवाला सोमवार दिनांक ०५ पासून सुरुवात होणार आहे. यंदा ७१ वर्षानंतर सोमवार पासून श्रावण महिना सुरु होत असल्याने विशेषतः पाच सोमवार येत असल्याने हरिहर रूपातील श्री परमेश्वर दर्शनाला महत्व प्राप्त झाले आहे.त्या निमीत्ताने मंदिर प्रशासनाने जय्यत तयारी केली असून, भाविकांना प्रसाद आणि पिण्याच्या पाण्यासह श्री दर्शनासाठी भाविकांना पश्चिमेकडून सोडण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकांनी शांततेत परमेश्वराचे दर्शन घेऊन मंदिर प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ यांनी नांदेड न्यूज लाइव्हच्या माध्यमातून केले आहे.
श्री परमेश्वर मंदिराचा इतिहास अतिप्राचीण असुन, हेमाडपंथी उत्तराभीमुख मंदिरातील गाभा-यात शिवशंकर – विष्णुच्या अवातारातील हरीहर रुपातील श्रीची उभी मुर्ती आहे. अत्यंत देखणी व सर्वांग सुंदर अशी श्री परमेश्वराची मुर्तीचे मनोभावे दर्शन घेऊन शहरातील नागरिक दररोज तर इतर गावचे भाविक भक्त दार सोमवारी आवर्जून हजेरी लावतात. हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिर सभागृहात श्रावण मास उत्सवाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसापूर्वी प्रशासकीय स्तरीय आढावा बैठक उपविभागीय अधिकारी श्री अविनाश कांबळे व तहसीलदार पल्लवी टेमकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. बैठकीनंतर मंदिर प्रशासनाने आणखी जय्यत तयारी केली असून, भाविकांना कोणतीही अडचण भासणार नाही याची खबारादरी घेत. श्री परमेश्वर दर्शनाची सोय केली आहे. दोन दिवसापासून खुद्द मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ यांनी स्वतः उभे राहून मंदिर परिसर स्वच्छ करून घेतेले. तसेच पंचामृताने मंदिराच्या सभागृहाची व पाकशाळेची स्वच्छता करण्यात आली आहे.
श्रावण मासात महिनाभर अन्नदान केले जाणार असून, सोमवारपासून श्री परमेश्वर मंदिरात परमपूज्य बालयोगी व्यंकटस्वामी महाराज यांच्या उपस्थितीत सुरु होणाऱ्या “ओम नमः शिवाय” नामजप यज्ञाची तयारी करण्यात आली असून, यासाठी डॉ.राजेंद्र वानखेडे, विठ्ठल ठाकरे, विलासराव वानखेडे, संजय माने व त्यांचे सहकारी प्रयत्नशील आहेत. या यज्ञात सकाळी आणि सायंकाळी अश्या दोन सत्रात भाविक भक्त सहभागी होऊन भगवंताचे नामस्मरण करणार आहेत. या यज्ञात बसणाऱ्यांना दूध, केळी, फराळ अश्या विविध प्रकारच्या प्रसादाचे वितरण भाविक भक्तांच्या सहकार्यातून केले जाणार आहे. तसेच श्रावण मासातील २१ दिवस विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. याची सुरुवात संगीतमय शिवपुराण कथेने दि.07 ऑगस्ट बुधवार पासून होणार आहे. शिवपुराण कथेचे प्रवचन हभप. भागवताचार्य विदर्भ केशरी स्वामी सारंग चैतन्यजी महाराज रा. अमरावती यांच्या मधुर वाणीतून होणार आहे.शिवपुराण कथा सोहळा संपताच दि.१४ ऑगस्ट रोजी भव्य महाप्रसादाव्या पंगतीने समारोप केला जाणार आहे.
तसेच भव्य संगीतमय ज्ञानेश्वरी भावकथेची सुरुवात दि.१६ ऑगस्ट रोज शुक्रवारी होणार असून, कथेचं व्यासपीठ हभप अर्जुन महाराज खडे रा.आळंदी यांच्या मधुर वाणीत संत ज्ञानेश्वर माऊलींची गाथा उपस्थित भाविकांना सांगितली जाणार असून, यातून विठू माऊलींचे दर्शन तसेच निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम… आदींचे झाकीच्या माध्यमातून उपस्थित भाविक भक्तांना दर्शन घडणार आहे. या कथेचा समारोप दि.२३ ऑगस्ट रोजी शुक्रवारी काल्याच्या कीर्तनाने होणार असून, त्यानंतर महाप्रसाद वितरित केला जाणार आहे.
त्यानंतर दि. २४ ऑगस्ट पासून संगीतमय भागवत कथेचे आयोजन करण्यात आले असून, भागवत कथेचे प्रवक्ता हभप.भागवताचार्य कु.वैष्णवी दीदी गोड, सोनखेडकर यांच्या मधुर वाणीतून होणार आहे. यातून भगवान श्रकृष्ण लीलांचे दर्शन उपस्थित भाविकांना घडणार आहे. या कथेचा समारोप दि.३१ ऑगस्ट रोजी शनिवारी काल्याच्या कीर्तनाने होणार असून, त्यानंतर भव्य महाप्रसाद वितरित केला जाणार आहे. तीनही धार्मिक प्रवचन व संगीत कथा श्रवण कार्यक्रम येथील श्री परमेश्वर मंदिर सभागृहात दररोज दुपारी ०२ ते ०५ वाजेपर्यंत चालणार आहेत. दरम्यान कथेचं ध्वनी व्यवस्थापन माऊली सांऊड सिस्टीम, डोल्हारी हे करणार असून, पवित्र श्रावण मासात आयोजित विविध धार्मिक कार्यक्रमाचा लाभ शहरासह पंचक्रोशीतील भाविक – भक्तांनी घ्यावा असे आवाहन श्री परमेश्वर मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, यांच्यासह सर्व संचालक मंडळींनी केले आहे.
या शिवाय मंदिर व परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. महिला व पुरुष पोलिस कर्मचारी, स्वयंसेवक, संस्थानचे कर्मचारी असणार आहेत. भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन सुमारे सकाळी ४ ते रात्री १० पर्यंत भाविकां दर्शन घेता येणार आहे. दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी मंदिर प्रशासनाला सहकार्य करून शांततेत दर्शन घयावे असे आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.