Arrangement of 133 buses : नांदेड जिल्ह्यातील निवडणूक कर्मचाऱ्यासाठी 133 बसेसची व्यवस्था -NNL

नांदेड| नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व 9 विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदानासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना 18 व 19 नोव्हेंबर 2024 रोजी मतदारसंघात नेऊन सोडणे व 20 नोव्हेंबर 2024 रोजी निवडणूक मतदान प्रक्रिया पार पाडल्यानंतर परत संबंधीत कर्मचारी यांना त्यांच्या मुळ विधानसभा मतदार संघात आणण्यासाठी 44 सीटरच्या एकूण 133 बसेस वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांनी आपल्या नियुक्त्या व वेळा बघून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक विभागाने केले आहे.

लांब पल्ल्यासाठी उद्या दिनांक 18 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 ते 4 तर जवळच्या केंद्रासाठी 19 तारखेला सकाळी 5 ते 7 या काळात कर्मचाऱ्यांसाठी बसेस उपलब्ध राहणार आहेत. आपल्या नियुक्त क्षेत्राकडे जाण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी याची नोंद घ्यावी.

कुठून निघतील बसेस – 83 -किनवट मतदारसंघातील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी शासकीय आयटीआय गोकुंदा, किनवट येथून बसेस निघणार आहेत. ८४ हदगाव मतदारसंघासाठी समाज कल्याण विभागाचे मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, बुध्दभूमी वसाहत, तामसा रोड, हदगाव येथून बस निघतील. 85 भोकर साठी नगरपरिषद नांदेड रोड, भोकर येथून तर 86 -नांदेड उत्तर व 87- दक्षिण साठी शासकीय तंत्रनिकेतन, नांदेड येथून बसेस निघणार आहेत. ८८ लोहासाठी पंचायत समिती, तहसिल कार्यालय परिसर लोहा येथून तर नायगावसाठी शासकीय आयटीआय, नायगाव येथून बसेस निघणार आहेत. 90- देगलूर साठी तहसिल कार्यालय, देगलूर येथून तर 91-मुखेडसाठी मुख्य प्रशासकीय इमारत तहसील कार्यालय, मुखेड येथून बसेस निघतील.

अशी आहे निवास व्यवस्था – किनवट मतदारसंघासाठी मातोश्री कमलताई ठमके इंग्लिश स्कूल, कोठारी (चि) किनवट येथे निवास व्यवस्था करण्यात आली आहे. तर हदगाव मतदारसंघासाठी मुलींचे वस्तीगृह इमारत क्र. २ तीसरा मजला, हदगाव येथे तर 85 भोकर साठी ओम लॉन्स मंगल कार्यालय, बायपास रोड, भोकर येथे निवास व्यवस्था केली आहे. 86 -नांदेड उत्तर व 87- दक्षिणसाठी निवास व्यवस्था ए.के.संभाजी मंगल कार्यालय, नांदेड येथे केली आहे. ८८ लोहा साठी निवास व्यवस्था श्रीनिवास मंगल कार्यालय साई गोल्डन, सिटी मेन रोड, लोहा येथे केली आहे. ८९- नायगावसाठी सामाजिक न्याय भवन, निवासी वसतीगृह नायगाव येथे निवास व्यवस्था येथे केली आहे.

90- देगलूर मतदार संघासाठी निवास व्यवस्था नगरेश्वर मंदीर व मंगल कार्यालय, देगलूर येथे केली आहे. 91-मुखेड मतदार संघासाठी कै. गोविंदराव राठोड बहुउद्देशिय सभागृह तालुका क्रीडा संकुल, बीएसएनएल टॉवरजवळ शांतीनगर, मुखेड येथे निवास व्यवस्था केली आहे. तरी मतदान अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लांब पल्ल्यासाठीच्या मतदारसंघात जाण्यासाठी 18 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 ते 4 यावेळेत आणि जवळच्या अंतरासाठी 19 नोव्हेंबर रोजी सकाळी 5 ते 6 वाजता बसेस उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. तरी मतदानासाठी नियुक्त अधिकारी कर्मचारी यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन वाहतुक व्यवस्थापन कक्ष प्रमुख तथा पुनर्वसन अधिकारी यांनी केले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button