नांदेडकृषी

Soyabeans amount ; सोयाबीन शासनाला देऊन ही रक्कम मिळाली नाही शेतकरी पत्रकारावर आली आमरण उपोषणाची वेळ

हदगाव, शेख चांदपाशा। हदगाव तालुक्यातील डोंगरगाव येथील शेतकरी यादव सुकापुरे (पत्रकार) यांनी महाराष्ट्र शासनाचा सोयाबीन खरेदी करण्याची जे निर्देश दिले होते. त्या निर्देशाच्या नियमानुसार संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन करून सोयाबीन देण्याचा ऑनलाईन नंबर आला. त्यामुळे दिनांक 6 फेब्रुवारी रोजी आपल्या शेतातील सोयाबीन हदगाव तालुक्यातील खरेदी विक्री संघ केंद्रावर 18 क्विंटल 500 किलो सोयाबीन दिले. त्याला सर्व कागदपत्रे लागणारे आधार बँकेचे पासबुक खरेदी-विक्री संघाचे कर्मचारी यांच्याकडे सुपूर्द केले.

पण आज 10 मे पर्यंत त्यांच्या खात्यावर 18 क्विंटल 500 किलो सोयाबीनची रक्कम 92 हजार रुपये पंधरा दिवसाच्या आत जमा व्हायला पाहिजे होती. पण ती आजपर्यंत जमा झाली नाही, सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या बाबतीत राज्याचे कृषिमंत्री लक्ष घालतील काय..? असा प्रश्न अनेक त्रस्त शेतकरी विचारीत आहे.

सोयाबीन दिल्यानंतर खरेदी विक्री संघाचे अधिकाऱ्यांशी वारंवार चर्चा करून सुद्धा नांदेड येथील डी एम ओ यांच्यासोबत सुद्धा भ्रमणध्वनीवरून चर्चा करून सुद्धा सोयाबीन रक्कमेसाठी आज…उद्या.. आज… उद्या… करत या शेतकऱ्यावर अखेर तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषणाची बसण्याची वेळ या अधिकाऱ्यांनी आणली आहे. खरीप पेरणीसाठी लागणारे साहित्य घेण्यासाठी एक रुपया शिल्लक नसल्यामुळे हा शेतकरी 20 मे रोजी हदगाव तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचे निवेदन देण्यात आले आहे.

तेचं सोयाबीन जर मार्केटमध्ये विकले असते तर त्या शेतकऱ्याला ताबडतोब पैसे तरी मिळाले असते. त्या शेतकरी(पत्रकार) आपला सोयाबीन देऊन उपोषणाला बसण्याची वेळ आली नसती. या निगरगट अधिकारी कर्मचारी यांच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अखेर आमरण उपोषणाला बसण्याची वेळ सुद्धा या अधिकारी कर्मचाऱ्यांनी आणली. त्यांच्यावर योग्य ते कार्यवाही करण्यात यावी व लवकरात लवकर  त्या शेतकऱ्याच्या खात्यात रक्कम दयावी. त्यामुळे जून मध्ये होणारी खरीपाची पेरणी करण्यासाठी बी… बियाणे खत आणण्यासाठी फायदा होईल अश्या अशयाचे निवेदन हदगाव तहसीलदार यांना देण्यात आली आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!