Homeनांदेडनांदेड जिल्हयात तीन नवीन कायदयांच्या अंमलबजावणी करीता नांदेड पोलीस दलाकडून जनजागृती कार्यक्रमांचे...

नांदेड जिल्हयात तीन नवीन कायदयांच्या अंमलबजावणी करीता नांदेड पोलीस दलाकडून जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन -NNL

नांदेड। जिल्हयात तीन नवीन कायदयांच्या अंमलबजावणी करीता नांदेड पोलीस दलाकडून जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, जनतेने कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी केले आहे.

भारतातील प्रमुख तीन फौजदारी कायदयांमध्ये सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. भारतात नव्याने 1) भारतीय न्याय संहिता 2023 2) भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 व 3) भारतीय साक्ष अधिनियम- 2023 या प्रमाणे कायदयांमध्ये बदल करण्यात आलेला आहे. या तीनही कायदयांना भारत सरकारने अधिसूचना जारी करुन मंजूरी दिली असल्याने दिनांक 01 जुलै, 2024 पासून तीनही कायदे संपुर्ण भारतात अंमलात येणार आहेत.

नवीन कायदयांची अंमलबजावणी होणे करीता व जनतेस नवीन कायदयाची माहिती सहजरीत्या प्राप्त होणेकरीता दिनांक 01 जुलै, 2024 रोजी नांदेड पोलीस दलाकडून जिल्हयात पोलीस स्टेशन अंतर्गत नवीन कायदयांच्या जनजागृती होणेकरीता विविध कार्यक्रम व बैठकांचे आयोजन करण्यात आलेले आहे.

तरी नांदेड जिल्हयातील नागरीकांनी उद्या दि 01 रोजी आयोजित केलेल्या बैटक व कार्यक्रमांना त्यांचे हद्दीतील पोलीस स्टेशन येथे व नांदेड शहरातील नागरीकांनी सकाळी 10.30 वाजता पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड येथे मोठ्या प्रमाणात हजर राहून सहभाग नोंदवावा असे आवाहन मा. पोलीस अधीक्षक श्री श्रीकृष्ण कोकाटे यांनी केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments