नांदेड जिल्हयात तीन नवीन कायदयांच्या अंमलबजावणी करीता नांदेड पोलीस दलाकडून जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन -NNL
नांदेड। जिल्हयात तीन नवीन कायदयांच्या अंमलबजावणी करीता नांदेड पोलीस दलाकडून जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, जनतेने कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी केले आहे.
भारतातील प्रमुख तीन फौजदारी कायदयांमध्ये सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. भारतात नव्याने 1) भारतीय न्याय संहिता 2023 2) भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 व 3) भारतीय साक्ष अधिनियम- 2023 या प्रमाणे कायदयांमध्ये बदल करण्यात आलेला आहे. या तीनही कायदयांना भारत सरकारने अधिसूचना जारी करुन मंजूरी दिली असल्याने दिनांक 01 जुलै, 2024 पासून तीनही कायदे संपुर्ण भारतात अंमलात येणार आहेत.
नवीन कायदयांची अंमलबजावणी होणे करीता व जनतेस नवीन कायदयाची माहिती सहजरीत्या प्राप्त होणेकरीता दिनांक 01 जुलै, 2024 रोजी नांदेड पोलीस दलाकडून जिल्हयात पोलीस स्टेशन अंतर्गत नवीन कायदयां...
