Express Train : नंदीग्राम एक्स्प्रेस आणि नागपूर- कोल्हापूर एक्स्प्रेसच्या संरचनेत बदल

नांदेड| दक्षिण मध्य रेल्वेने नांदेड विभागातून धावणाऱ्या गाडी क्रमांक 11001/11002 बल्हारशाह जंक्शन- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- बल्हारशाह जंक्शन नंदीग्राम एक्स्प्रेस आणि गाडी क्रमांक 11403/11404 नागपूर -कोल्हापूर – नागपूर एक्स्प्रेस या गाडीच्या संरचनेत बदल (Changes in the structure of Nandigram Express and Nagpur-Kolhapur Express) केला आहे.


1. गाडी क्रमांक 11001/11002 बल्हारशाह जंक्शन- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बल्हारशाह जंक्शन नंदीग्राम एक्स्प्रेस या गाडीमध्ये दिनांक 05.09.2025 पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या गाडीत आणि दिनांक 07.09.2025 पासून बल्हारशाह जंक्शन येथून सुटणाऱ्या गाडीत 02 शयनयान (स्लीपर क्लास) चे डब्बे कमी करून 02 द्वितीय श्रेणी (जनरल) चे डब्बे वाढविण्यात येणार आहेत, या बदलानंतर या गाडीत शयनयान (स्लीपर क्लास चे) 08 डब्बे आणि द्वितीय श्रेणी (जनरल) चे 04 डब्बे जोडण्यात येतील.

2. गाडी क्रमांक 11403/11404 नागपूर कोल्हापूर नागपूर एक्स्प्रेस या गाडीमध्ये दिनांक 05.09.2025 पासून कोल्हापूर येथून सुटणाऱ्या गाडीत आणि दिनांक 06.09.2025 पासून नागपूर येथून सुटणाऱ्या गाडीत तृतीय श्रेणी वातानुकुलीत (3AC) चा एक डब्बा कमी करून द्वितीय श्रेणी (जनरल) चा एक डब्बा वाढविण्याचे ठरविण्यात आले आहे, या बदलानंतर या गाडीत तृतीय श्रेणी वातानुकुलीत (3AC) चे 03 डब्बे आणि द्वितीय श्रेणी (जनरल) चे 04 डब्बे जोडण्यात येतील.


पंढरपूर – हुजूर साहिब नांदेड – पंढरपूर अनारक्षित विशेष गाडी
पंढरपूर येथील आषाडी एकादशी निमित्त होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे ने पंढरपूर ते नांदेड दरम्यान एक अनारक्षित विशेष गाडी चलविण्याचे ठरविले आहे, ते पुढील प्रमाणे – 1. गाडी क्र. . 01217 पंढरपूर ते हुजूर साहिब नांदेड विशेष गाडी : हि विशेष गाडी पंढरपूर येथून दिनांक 7 जुलै रोजी सायंकाळी 18.00 वाजता सुटेल आणि मोद्लींब, कुर्डूवाडी, शेंदरी, बार्शी, पांगरी, धाराशिव, येडशी, कळंब , ढोकी, मुरुड, औसा रोड, हरंगुळ, लातूर, लातूर रोड, परळी वैजनाथ, परभणी या रेल्वे स्थानकांवर थांबेल आणि हुजूर साहिब नांदेड येथे 8 जुलै ला सकाळी 06.30 वाजता पोहोचेल. 2. गाडी क्र. 01218 हुजूर साहिब नांदेड ते पंढरपूर विशेष गाडी : हि गाडी हुजूर साहिब नांदेड येथून दिनांक 8 जुलै रोजी सकाळी 08.00 वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गानेच पंढरपूर येथे सायंकाळी 17.30 वाजता पोहोचेल.



