नांदेड| भारतीय शेतीची अवस्था रोजच्या रोज खालावत आहे .धर्म, राजकारण ,निसर्ग, राजकारणी लोकांची उदासीनता शेतकऱ्याचे अज्ञान ,आसमानी आणि सुलतानी संकटामुळे शेती शेतकरी उध्वस्त होत आहेत. या प्रश्नांची उकल लेखकाने आपल्या साहित्यातून करावी असे उद्गार यशवंतराव चव्हाण विचार मंचाच्या वतीने आयोजित पुरस्कार सोहळ्यात डॉ. जगदीश कदम यांनी काढले. यशवंतराव चव्हाण विचार मंचाच्यावतीने कै. संभाजी पाटील शिंदे व स्वातंत्र्यसैनिक कै. एकनाथरावजी शिंदे व डॉ कै. प्र भा. काळे यांच्या नावाने पुरस्कार दिले जातात.
यावर्षीचा कै.संभाजी पाटील शिंदे पुरस्कार मराठी साहित्यातील प्रसिद्ध लेखक केशव बा .वसेकर यांच्या या शेताने गळा कापला या पुस्तकाला जाहीर झाला होता.तो. प्रदान करण्यात आला. त्याचबरोबर भारतीय संविधान निर्मितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान या पुस्तकाला स्वातंत्र्यसैनिक कै. एकनाथराव शिंदे पुरस्कार डॉ.भीमराव राऊत यांना प्रदान करण्यात आला .त्याचबरोबर धर्म या पुस्तकासाठी प्र भा काळे पुरस्कार डॉ. भरत गहलोत यांना प्रदान करण्यात आला .
साईनाथ राहाटकर यांना ही पुरस्कार वितरण करण्यात आला.याप्रसंगी विचार मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून देविदास फुलारी हे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून बोलत असताना देविदास फुलारी म्हणाले की धर्म आणि राजकारण यासंदर्भात आपली विस्तृत मांडणी केली व समाजातील घटकांनी धर्मनिरपेक्षता व राज्यघटनेतील मूल्यांचे अनुसरण करावे अशा प्रकारचे मत व्यक्त केले लोकसंवाद साहित्य संमेलनाचे निर्वाचित अध्यक्ष प्रा. महेश मोरे प्रा. सुदर्शन धर्माधिकारी प्रा. डी .बी जांभरूनकर डॉ.शिवाजीराव शिंदे इत्यादी मान्यवर विचार मंचावर उपस्थित होते .
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक नारायण शिंदे यांनी केले तर या कार्यक्रमाची सुरेख असे सूत्रसंचालन डॉ. संजय जगताप यांनी केले या कार्यक्रमाला स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ.मा मा जाधव , मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. माधव जाधव डॉ. कमलाकर चव्हाण लेखक भगवान अंजनीकर जेष्ठ साहित्यिक दता डांगे, नरेंद्र नाईक, सौ प्राजंली रावणगावकर, राम कपाळे,दिगंबर कदम, निर्मलकुमार सुर्यवंशी,प. श्री जाधव, विश्व बंर भोसीकर, प्रा प्रभाकर जाधव, डॉ गोविंद भाकरे, प्रा. खवास पाटील, श्रीनिवास मस्के, विजयकुमार चितरवाड,मुकुंद बोकारे व नांदेड जिल्ह्यातील मान्यवर साहित्यिक लेखकांची उपस्थिती होती