The writer should deal : लेखकाने शेतीमातीचे प्रश्न जिव्हाळ्याने आणि वास्तविकतेने हाताळावेत डॉ. जगदीश कदम -NNL
नांदेड| भारतीय शेतीची अवस्था रोजच्या रोज खालावत आहे .धर्म, राजकारण ,निसर्ग, राजकारणी लोकांची उदासीनता शेतकऱ्याचे अज्ञान ,आसमानी आणि सुलतानी संकटामुळे शेती शेतकरी उध्वस्त होत आहेत. या प्रश्नांची उकल लेखकाने आपल्या साहित्यातून करावी असे उद्गार यशवंतराव चव्हाण विचार मंचाच्या वतीने आयोजित पुरस्कार सोहळ्यात डॉ. जगदीश कदम यांनी काढले. यशवंतराव चव्हाण विचार मंचाच्यावतीने कै. संभाजी पाटील शिंदे व स्वातंत्र्यसैनिक कै. एकनाथरावजी शिंदे व डॉ कै. प्र भा. काळे यांच्या नावाने पुरस्कार दिले जातात.
यावर्षीचा कै.संभाजी पाटील शिंदे पुरस्कार मराठी साहित्यातील प्रसिद्ध लेखक केशव बा .वसेकर यांच्या या शेताने गळा कापला या पुस्तकाला जाहीर झाला होता.तो. प्रदान करण्यात आला. त्याचबरोबर भारतीय संविधान निर्मितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान या पुस्तकाला स्वातंत्र्यसैनिक कै. एकनाथराव शिंदे पुरस्कार डॉ.भीमराव राऊ...
