हिमायतनगर, अनिल मादसवार| तालुक्यातील घारापुर येथील विद्यार्थ्यांची होणारी शैक्षणिक हेळसांड लक्षात घेता एस टी महामंडळाने सोमवार पासून मानव विकास मिशनची बस चालू केली आहे. पहिल्यांदा बस गावात येताच गावकर्यांनी व विद्यार्थ्यांनी चालक – वाचकांचे स्वागत करून यासाठी प्रयत्न करणारे सामाजिक कार्यकर्ते दयानंद हाटे यांचे देखील आभार मानले आहे.

मागील काही वर्षांपासून घारापुर येथील विद्यार्थ्यांची पावसाळ्याच्या दिवसात शाळेत ये जा करण्यासाठी होत असलेली अडचण लक्षात घेऊन एसटी महामंडळाकडे मानवी विकासची बस चालू करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते दयानंद हाटे यांनी निवेदन देऊन केली होती. त्यांच्या मागणीला यश आले मिळाले असून, दिनांक २३ सोमवारपासून एसटी महामंडळाने बस चालू केली आहे.

मानव विकास मिशनची बस पहिल्यांदा गावात आल्यामुळे गावकरी, नागरिक व विद्यार्थ्यांनी चालक जी सी राठोड, वाहक आर व्ही बारसे यांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करत आभार मानले आहे. कामारी, पिंपरी, विरसनी, टेम्भुर्णी फाटा, घारापुर, दिघी फाटा, मार्गे हिमायतनगर अशी बसची फेरी होणार असून, ही बस शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधेसाठी महत्त्वपूर्ण झाली आहे. एसटी बस सुरू करण्यासाठी प्रयत्न करणारे दयानंद हाटे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला असून, यावेळी गावातील नागरिक शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



गावामधून एसटी महामंडळाचे बस सुरू व्हावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते दयानंद हाटे यांनी ग्रामपंचायतीच्या ठरावासह निवेदन देऊन एस टी महामंडळ आगाराकडे वारंवार पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुरावाला यश आल्याने शालेय विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी होणारी हेळसांड थांबली आहे. मागील अनेक वर्षांच्या काळात या गावातून बसची व्यवस्था नसल्यामुळे पावसाळ्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत होते. तसेच येथून ये जा करण्यासाठी कोणती वाहन व्यवस्था नसल्यामुळे विद्यार्थ्यांची शाळा बुडत होती. विद्यार्थ्यांची शैक्षणिक वर्षाचे होणारे नुकसान लक्षात घेऊन एसटी महामंडळाने बस सुरू केल्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने आभार दयानंद हाटे यांनी आभार मानले आहेत. यावेळी शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आनणे, सतत कमी होत असलेल्या शाळांमध्ये मुलींची संख्या वाढवणे, बालविवाहाचे प्रमाण कमी करणे इत्यादी उद्देशाने, सर्व मुलींना गाव आणि शाळा दरम्यान मोफत बस सेवेचा लाभ देण्यासाठी राज्य सरकारने २०१२ मध्ये ही योजना सुरू केली होती. मागील अनेक वर्षाखाली रस्ता नसल्याने चिखलातून मार्ग काढत घारापुरी येथील विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करावे लागत होते. आता रस्ता झाला तरीदेखील बस चालू करण्यात आली नव्हती. हि बाब लक्षात घेऊन गावामधून एसटी महामंडळाचे बस सुरू व्हावी यासाठी निवेदन देऊन पाठपुरावा केल्याने बस सुरु झाली असल्याची प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते दयानंद हाटे यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना दिली.

