Manav Vikas Mission bus has provided : मानव विकास मिशनची बस सुरु झाल्याने घारापुर येथील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला मिळाला आधार
हिमायतनगर, अनिल मादसवार| तालुक्यातील घारापुर येथील विद्यार्थ्यांची होणारी शैक्षणिक हेळसांड लक्षात घेता एस टी महामंडळाने सोमवार पासून मानव विकास मिशनची बस चालू केली आहे. पहिल्यांदा बस गावात येताच गावकर्यांनी व विद्यार्थ्यांनी चालक - वाचकांचे स्वागत करून यासाठी प्रयत्न करणारे सामाजिक कार्यकर्ते दयानंद हाटे यांचे देखील आभार मानले आहे.
मागील काही वर्षांपासून घारापुर येथील विद्यार्थ्यांची पावसाळ्याच्या दिवसात शाळेत ये जा करण्यासाठी होत असलेली अडचण लक्षात घेऊन एसटी महामंडळाकडे मानवी विकासची बस चालू करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते दयानंद हाटे यांनी निवेदन देऊन केली होती. त्यांच्या मागणीला यश आले मिळाले असून, दिनांक २३ सोमवारपासून एसटी महामंडळाने बस चालू केली आहे.
मानव विकास मिशनची बस पहिल्यांदा गावात आल्यामुळे गावकरी, नागरिक व विद्यार्थ्यांनी चालक जी सी राठोड, वाहक आर व्ही बारसे यांचे शाल...
