Homeनांदेडstop looting of students : प्रियदर्शनी स्कूलमधील विद्यार्थ्यांची लूट थांबवा पालकाची शिक्षणमंत्र्यांकडे...

stop looting of students : प्रियदर्शनी स्कूलमधील विद्यार्थ्यांची लूट थांबवा पालकाची शिक्षणमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

नांदेड| नांदेड येथील प्रियदर्शनी ग्लोबल इंग्लिश स्कूलचे संचालक हे 2019 मधील कोविड काळातील फिस व त्यावरील व्याज लावून 17 ते 18 हजार रूपये भरा अन्यथा दहावी पासची टी.सी. देणार नाही, असे सांगून विद्यार्थ्यांची लूट करीत आहेत. ही लूट थांबवून न्याय देण्याची मागणी शिक्षणमंत्री तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे नामदेव पांचाळ यांनी केली आहे.

प्रियदर्शनी ग्लोबल इंग्लिश स्कूलमध्ये कु. नेहा नामदेव पांचाळ ही विद्यार्थिनी पहिले दहावीपर्यंत शिक्षण घेत होती. कु. नेहा पांचाळ ही दहावी परीक्षेत पास झाल्यानंतर टी.सी. काढण्यासाठी शाळेत गेली असता शाळेचे संचालक हे 2019 मधील कोविड काळातील फिस व त्यावरील व्याज लावून 17 ते 18 हजार रूपये भरण्यास सांगत आहेत. त्यामुळे गरीब विद्यार्थिनीची कुचंबना होत आहे. शासनाने कोविड काळातील फिस माफ केलेली असताना सदरील शाळेचे संचालक विद्यार्थ्यांची लूट करत आहेत. ही लूट थांबवावी, अशी मागणी शिक्षणमंत्री तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे नामदेव पांचाळ यांनी केली आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments