मुंबई| संत रविदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ अर्थात लिडकाॅमचे जुने कर्ज तात्काळ माफ करुन नविन कर्जासाठी महाराष्ट्र शासनाने या महामंडळास तीन हजार कोटींचे बजेट द्यावे अशी मागणी चर्मकार ऐक्य परिषदेचे प्रदेश महासचिव इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी केली.


चर्मकार समाजाची शिखर संघटना “चर्मकार ऐक्य परिषद” आयोजित महा एल्गार आंदोलनात आझाद मैदान मुंबई येथे इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर हे बोलत होते. ऐक्य परिषदेचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर आणि प्रदेश कार्याध्यक्ष डाॅ. वसंतराव धाडवे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. मागील अनेक वर्षांपासून चर्मकार समाजाचे असंख्य ज्वलंत प्रश्न शासन दरबारी प्रलंबित असल्याबद्दल आपल्या भाषणातून आक्रोश व्यक्त करतांना इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर पुढे म्हणाले की, चर्मोद्योग महामंडळ असून अडचण नसून खोळंबा असे झाले आहे.


माय जेऊ घालेन आणि बाप भीक मागू देईना अशी या महामंडळाची दयनीय अवस्था झाली असून समाजाचे अकरा आमदार, दोन खासदार, मंत्री हे डोळे झाकून झोपलेत काय ? जातीचे प्रमाणपत्र लाऊन समाजाच्या आरक्षणावर निवडून आलेले हे लोकप्रतिनिधी जर समाजाप्रती उदासीन असतील तर त्यांना जागे करण्यासाठी येणाऱ्या काळात त्यांच्या घरासमोर आक्रोश आंदोलने करण्यात येतील. वाशीमचे आ. श्याम खोडे यांनी आंदोलनास भेट देऊन पाठींबा जाहिर केला तर आ. नरेंद्र भोंडेकर (भंडारा) यांनी आपला प्रतिनिधी पाठऊन आंदोलनास लेखी पाठिंबा जाहीर केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष कानडे (अहिल्यानगर) यांनी केले तर प्रास्ताविक सुभाष मराठे (मुंबई) यांनी केले.


या आंदोलनात पूजा कांबळे, प्रियंका गजरे, सुवर्णा डोईफोडे, अशोक कांबळे, राजेश साबळे, सचिन वाघमारे, श्री सुर्यवंशी (मुंबई), ॲड. दिलीप वाळंज (कल्याण), संजय बनसोडे, दिनेश जाधव, हरिभाऊ खंदारे (पुणे), स्वप्नील मोरे (चाळीसगाव), दिनेश देवरे (पाचोरा), केरबा कसारे (हिंगोली), ॲड. दयानंद उदबाळे (उदगीर), प्रकाश गायकवाड, सचिन कल्याणकर, प्रकाश कामळजकर, साईनाथ भालके, अशोक गंगासागरे, शेखर गिरगावकर (नांदेड), आसाराम दहिहंडे (पैठण), सुरेश कांबळे (बीड), अशोक शिंदे (सांगली), विजय कांबळे (वर्धा), श्री शेगोकार (शेगाव) आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय खामकर, सुभाष मराठे व त्यांच्या टीमने भरपूर परिश्रम घेतले. आंदोलन स्थळी बिसलरीचे पाणी व भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. पाऊस व विविध ठिकाणच्या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमांमुळे थोडीशी उपस्थिती कमी होती पण कार्यकर्त्यांत प्रचंड उत्साह दिसून येतात. आंदोलनस्थळी दिवसभर प्रचंड घोषणाबाजी आणि भाषणे करण्यात आली.


