Eng. Chandraprakash Degalurkar : किन्हाळा येथे अण्णाभाऊ साठे सभागृहात अभ्यासिका व ग्रंथालय सुरु करावे – इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर
नांदेड| जिल्ह्यातील नरसी येथून जवळच असलेल्या किन्हाळा (ता. बिलोली) येथे अण्णाभाऊ साठे सभागृहात अभ्यासिका व ग्रंथालय सुरु करावे असे आवाहन नांदेड येथील सुप्रसिद्ध साहित्यिक व व्याख्याते इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी केले.
रविवार दि. १७ ऑगस्ट २०२५ रोजी किन्हाळा येथे आयोजित साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंती महोत्सवात इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांचे व्याख्यान ठेवण्यात आले होते, त्यास चांगला प्रतिसाद मिळाला.
रविवारी सकाळी ९ वाजता मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व लगेच साहित्य सम्राट डाॅ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती महोत्सवात अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे नेते, सुप्रसिद्ध साहित्यिक व परखड वक्ते इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी शिक्षणाशिवाय आपला उद्धार होणार नसल्याचे सांगितले. आपल्या घरात फक्त कारकून व शिपाई तयार न होता आएएएस, आयपीएस अधिकारी तयार झाले ...

