Police take strong action : बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर विना अन्नपाणी क्रूरतेन बांधून ठेवणाऱ्या व्यक्तीवर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

नांदेड| शहरातील कत्तल करण्याच्या उद्देशाने बांधून ठेवलेल्या ३८ जनावरांसह १४ लक्ष ६७ हजार रुपयाचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे. ऐन बकरी ईदच्या काही दिवस अगोदर करण्यात आलेल्या या कार्यवाहीने कत्तलीसाठी जनावरांची तस्करी करणाऱ्यांत एकच खळबळ उडाली आहे.


याबाबत सविस्तर वृत्त असे कि, अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी बकरी ईद निमित्त गोवंश जातीचे जनावरे वाहतुक व कत्तलीसाठी विना अन्नपाणी क्रूरतेन बांधून ठेवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्याचे उप विभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग शहर व इतवारा यांना आदेशित केले होते. त्या अनुषगाने सुशिलकुमार नायक, उप विभागीय पोलीस अधिकारी, उप विभाग इतवारा, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी संयुक्तीकरित्या पथक गठीत करुन दिनांक ३० मे २०२५ रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे छापा टाकला.


यामध्ये पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण हद्दीतील टायबोई कमानजवळी सर्वजनिक जागेन, पोस्टे इतवार हद्दीतील राम रहिमनगर, गंगानगर, मदिना नगर, व पोस्टे विमानतळ हद्दीतील आसरा नगर पाटी भागात छापा मारुन 1) मोहंमद अरबाज मोहंमद कासिम खुरेशी रा. रामरहिम नगर गंगानगर नांदेड 2) समीर कुरेशी ईस्माईल कुरेशी रा. खुबेनगर नांदेड, ४) शेख अन्बर शेख अहेमद हुसेन, रा राजेंद्र प्रताप वार्ड उमरखेड जि यवतमाळ, ३) मोहंमद वसीम मोहंमद मजीद खुरेशी रा. मदीनानगर नांदेड यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडुन वेगवेगळ्या ठिकाणावरुन कत्तल करण्याच्या उद्देशाने विना चारा पाणी क्रूरतेने बांधून ठेवलेले व कत्तलोसाठी नेण्यात येणारे एकूण ३८ गोवंश जातीचे जनावरे असे एकूण १४ लक्ष ६७ हजार रुपयाचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे.



हि कार्यवाही सुशिलकुमार नायक, उप विभागीय पोलीस अधिकारी इतयारा, ओमकांत चिचोलकर पो.नि. नांदेड ग्रामीण, रंनजित भोईटे, पो.नि पोस्टे इतवारा, गणश चव्हाण, पी. नि पोस्ट विमानतळ, पोडर्शन ज्ञानेश्वर मटवाइ, पोउपनि बाबुराव चव्हाण, पोउपनि रमेश गायकवाड, पोउपनि पंकज इंगळे, पोउपनि प्रदिप साखरे, पहेिको दासिंग राठोड, तेलंगे, पांहेको दोलत ताटे, संतोष राणे, पोहेकी ४३६ मेकाले, १२११ कंलंदर, ८०२ वाजीद, पांना अर्जुन मुंडे, पोकों श्रीराम दासरे, जगताप, जावेद, विष्णु कल्याणकर, रामदास आवळे, संतोष पवार, राजेश माने, शेख सोहब यांनी केली आहे. वरील कामगीरी करणारे तीनही पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांनी केलेल्या कामाचे वरीष्ठांनी कौतुक केले आहे.




