नांदेडलाइफस्टाइलव्हिडीओ

The first rains : कामारी परिसरात मंगळवारी झालेल्या पहिल्याच पावसाने अंगणवाडी भागात निर्माण झाले तळे

हिमायतनगर| तालुक्यातील मौजे कामारी परिसरात मंगळवारी झालेल्या पावसाने अंगणवाडी परिसरात तीन ते चार फूट पाणी साचून पहिल्याच पावसाने तळे निर्माण झाले आहे. त्यामुळे चिमुकल्या बालकांसह अंगणवाडीच्या कार्यकर्ती मदतनीस याना सुद्धा ये – जा करणे अवघड बनले आहे. साचलेल्या पाण्यामुळे साथीचे आजार निर्माण होऊन चिमुकल्या विद्यार्थ्यांचे आरोग्य धोकाय येण्याची भीत व्यक्त केली जात आहे. तात्काळ या साचणाऱ्या पाण्याचा बंदोबस्त करावा अन्यथा अंगणवाडीला कुलूप ठोकण्यात येईल असा इशाराही पालकांनी दिला आहे.

शिक्षणाचे प्रथम स्थान असलेल्या अंगणवाडी बालकांच्या आरोग्याचा प्रश्न सुटत नाही. हि गंभीर बाब झाली आहे. मौजे कामारी ता. हिमायतनगर जि.नांदेड हे गाव सांगायला तालुक्यातील दुय्यम बाजारपेठेचे असून, गावात हव्या त्या सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत. त्यामुळे गावासाठी येणाऱ्या निधीचा उपयोग होतोय कश्यासाठी असा प्रश्न गावकर्यांना पडला आहे. गावातील रस्ते, नाल्या व इतर विकास कामे सरपंच ग्रामसेवक यांच्या अंतर्गत केली जात असताना अंगणवाडी परिसरात पाणी साचणार नाही याबाबत उपाययोजना का केल्या गेल्या नाहीत असा प्रश्न या निमित्ताने समोर आला आहे.

बुधवारी रात्री झालेल्या पहिल्याच पावसाने कामारी गावातील अंगणवाडी क्रमांक 1 व 3 या परिसरात अडीच ते तीन फूट पाणी साचले आहे. यामुळे एकाही विद्यार्थ्याला किंवा बालकालाच काय तर अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस यांना सुद्धा अंगणवाडीमध्ये ये जा करता येत नाही. क्रमांक एक व तीन अंगणवाडीमध्ये मिळून जवळपास 70 च्या वर विद्यार्थी संख्या आहे. वारंवार ग्रामपंचायत व संबंधित अंगणवाडी च्या वरिष्ठ प्रशासनाला कळवून सुद्धा त्यांनी याची दखल घेतलेली नाही.

anganwadi 1 1 The first rains : कामारी परिसरात मंगळवारी झालेल्या पहिल्याच पावसाने अंगणवाडी भागात निर्माण झाले तळे

त्यामुळे आज लहान लहान बालकांच्या जीवाशी खेळण्याचे काम अंगणवाडी प्रशासन करत आहे. या साचलेल्या पाण्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, साचलेल्या पाण्यामुळे साथीचे आजार जडून विद्यार्थ्यांच्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास बालविकास विभागातील अधिकारी, सुपरवायजर व ग्रामपंचायत प्रशासन जबाबदार राहील अशी प्रतिक्रिया चिमुकल्या बालकांच्या पालकांनी दिली आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!